AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरात काळोखी खोली अन् त्यात…; भोंदू बाबा अशोक खरातचे मोठे रहस्य उलगडणार

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आज अशोक खरातच्या मिरगाव येथील फार्म हाऊस आणि मंदिराची पाहणी करणार असून, त्यांनी खरातवर लैंगिक शोषण आणि हत्येचे गंभीर आरोप केले आहेत.

मंदिरात काळोखी खोली अन् त्यात...; भोंदू बाबा अशोक खरातचे मोठे रहस्य उलगडणार
Trupti Desai Ashok Kharat
| Updated on: Mar 24, 2026 | 8:19 AM
Share

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या कृत्यांनी महाराष्ट्र हादरला आहे. आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उडी घेतली आहे. तृप्ती देसाई आज मिरगाव दौरा करणार आहेत. यावेळी त्या अशोक खरातच्या मिरगाव येथील फार्म हाऊससह ईशान्यश्वर मंदिरातील रहस्यमय काळोख्या खोलीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यामुळे मोठे गौप्यस्फोट समोर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतंच त्या मिरगावसाठी रवाना झाल्या आहेत.

स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरातच्या धक्कादायक कृत्यांमुळे सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी आज थेट अशोक खरातच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच मिरगाव येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यामुळे खरातच्या गुन्हेगारी साम्राज्यातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तृप्ती देसाई यांनी या दौऱ्यापूर्वी अशोक खरातवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. अशोक खरातची ईशान्यश्वर मंदिरात काळोखी खोली होती. या खोलीचा वापर महिलांच्या लैंगिक शोषणासाठी केला जात असे, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे. आजच्या दौऱ्यात तृप्ती देसाई या त्या खोलीची पाहणी करणार आहेत. त्यासोबतच त्या फार्म हाऊसची पाहणी करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

सध्या गावातील लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. खरातच्या विरोधात बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती, पण आता लोकांनी मला फोन करून तिथे येण्याची विनंती केली आहे. मी स्वतः त्या काळोख्या खोलीची आणि संपूर्ण फार्म हाऊसची पाहणी करणार आहे, असे तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियाला पळ काढण्याचा होता कट 

अशोक खरात केवळ महिलांचे शोषणच करत नव्हता, तर त्याने जमिनी हडपण्याचे मोठे रॅकेट चालवले होते. अशोक खरात हा १२ मार्च २०२६ रोजी ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याने अनेक निष्पाप लोकांना बेपत्ता केले असून काहींची हत्या केल्याचा संशय आहे. लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने बळकावणे आणि विरोध करणाऱ्यांचा काटा काढणे, ही त्याची कार्यपद्धती होती, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला.

आता या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. रुपाली पाटील यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, त्या पक्षात मोठ्या पदाधिकारी नाहीत आणि त्या सतत अनावश्यक विधाने करत असतात. विशेष म्हणजे मी आता थेट सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. येत्या गुरुवारनंतर सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा आणि रुपाली पाटील यांना प्रवक्ते पदावरून हटवावे, अशी मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे,” असे तृप्ती देसाई यांनी जाहीर केले.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन