राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेला आमचा विरोध; पवार हे जातीवादी नाहीत : आठवले

| Updated on: Apr 13, 2022 | 5:44 PM

लातूर : राज ठाकरे हे त्यांच्या वक्तव्यामुळे कायमच वादात सापडलेले असतात. त्यांची शिवतिर्थावर पार पडलेल्या सभेनंतर आणि मशिदीवरील भोंग्यावर वक्तव्यानंतर जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर त्या टीकेला उत्तर देण्यासाठी आणि विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यासाठी आज राज ठाकरेंनी ठाण्यात सभा घेत विरोधकांवर हल्लाबोल चढवला. यासभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर […]

राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेला आमचा विरोध; पवार हे जातीवादी नाहीत : आठवले
राज ठाकरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
Follow us on

लातूर : राज ठाकरे हे त्यांच्या वक्तव्यामुळे कायमच वादात सापडलेले असतात. त्यांची शिवतिर्थावर पार पडलेल्या सभेनंतर आणि मशिदीवरील भोंग्यावर वक्तव्यानंतर जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर त्या टीकेला उत्तर देण्यासाठी आणि विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यासाठी आज राज ठाकरेंनी ठाण्यात सभा घेत विरोधकांवर हल्लाबोल चढवला. यासभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाना साधताना जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी राज्यातील मुस्लिम समाजाच्या आजान देण्यावर आणि मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यावर जोरदार टीका केली. तसेच राज ठाकरेंची सरकारला भोंगे उतरवण्यासाठी डेडलाईनच दिली. तसेच सरकारला भोंगे न उतरवल्यास हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार, म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) भोंगे लावण्यावर ठाम असल्येचही त्यांनी सांगितले. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या भुमिकेवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी मशिदीवरील भोंगे काढायला आरपीआयचा विरोध असल्याचे म्हटले. तर याचवेळी आठवले यांनी शरद पवार यांचे समर्थन करताना, शरद पवार हे जातीवादी नाहीत. पवार दलित आणि बहुजन समाजाला सोबत घेऊन जाणारे नेते असल्याचे म्हटले आहे. तर अलीकडे राज ठाकरेंचा तोल सुटत असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे. ते लातूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

भोंगे लावा; विरोध नाही

तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देशातील मुस्लिम हे देशातीलच आहेत. हे लोक पुर्वी हिंदू होते त्यापूर्वी ते बौध्द होते. मात्र मोगल देशात आले तेव्हा लोक मुस्लिम झाले, असे म्हटले आहे. तर शंकराचार्य यांनी देशात हिंदू धर्म आणला आणि देशात हिंदू वाढले. त्याचवेळी देशात इंग्रज आले आणि अनेक लोक ख्रिश्चन झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांना पत्रकारांना राज यांच्या मशिदीवरील भोगे काढण्याच्या भुमिकेबद्दल विचारले असता, त्याला आमचा विरोध आहे. मंदिरावर भोंगे लावा त्याला आमचा विरोध नाही पण मशिदीवर भोंगे काढायला आरपीआयचा विरोध आहे. देशात पेशवाई नसून लोकशाही असल्याने आपली राज ठाकरेंना विनंती असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांनी यावेळी बाळासाहेबांनीदेखील कधीही भोंगे काढा असेल म्हंटले नाही. मात्र राज ठाकरे मुस्लिमांच्या मागे का लागले आहेत, असा सवाल केला. तर मनसेच्या पहिल्या झेंड्यात पाच रंग होते. त्यात हिरवा आणि निळा रंग होता याची आठवण ही आठवले यांनी करवून दिली. तसेच ते म्हणाले मनसेच्या पहिल्या झेंड्यात हिरवा आणि निळा रंग होता हे जरी खरे असले तरिही त्यांच्या मागे लोक गेले नाही. त्यामुळे आता त्यांनी भगवा रंग घेतला आहे. राज ठाकरे काहिही बोलले तरी मशिदीवरील भोंगे काढू नये असे आवाहन ही यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाला केले.

शरद पवारांचे समर्थन

तसेच राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह शरद पवार यांच्यावर निशाना साधताना होता. त्यावर बोलताना रामदास आठवले यांनी शरद पवार यांचे समर्थन केले. तसेच त्यांनी, शरद पवार जातीवादी नाहीत. पवार दलित आणि बहुजन समाजाला सोबत घेऊन जाणारे नेते असल्याचे म्हटले. पवार हे शिवाजी महाराजांना माननारे नेते आहेत. फक्त वैचारिक भूमिका म्हणून ते फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेतात. तर राज ठाकरे म्हणतात म्हणून पवारांनी शिवाजी महाराजांचे नाव घ्यावेच का असा सवाल ही त्यांनी केला. तसेच पवार हे सगळ्या जातीधर्माचे असल्यानेच त्यांनी मराठावाडा विद्यापीठ नामांतरासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते. त्यामुळे पवारांना जातीवादी म्हणणे चुकीचे आहे.

इतर बातम्या : 

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना न्यायलयीन कोठडी पण ताबा सातारा पोलिसांकडे, प्रकरण काय?

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; सातारा पोलीस ताब्यात घेणार?

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे, जयश्री पाटीलही सहआरोपी; सरकारी वकिलांनी काय सांगितलं?