प्रत्येकाच्या मागे मी पोलीस लावू शकत नाही, डॉक्टर-व्यापाऱ्यांच्या बाचाबाचीनंतर औरंगाबादचे आयुक्त संतप्त

व्यापारी आणि दुकानदारांच्या कोरोना टेस्ट करण्यावरुन औरंगाबादेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं (Dispute in Traders and Doctors on Corona Test).

प्रत्येकाच्या मागे मी पोलीस लावू शकत नाही, डॉक्टर-व्यापाऱ्यांच्या बाचाबाचीनंतर औरंगाबादचे आयुक्त संतप्त
Follow us
| Updated on: Jul 18, 2020 | 4:34 PM

औरंगाबाद : व्यापारी आणि दुकानदारांच्या कोरोना टेस्ट करण्यावरुन औरंगाबादेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं (Dispute in Traders and Doctors on Corona Test). यानंतर कोरोना चाचणी करणारे डॉक्टर आणि व्यापारी यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली. औरंगाबादमधील कोरोना टेस्ट सेंटरमधील हा गदारोळ झाल्यानंतर प्रशासनही हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक अस्तिककुमार पांडे यांनी तर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

औरंगाबाद महापालिका प्रशासनाने प्रत्येक व्यापाऱ्याला दुकान सुरु करण्यासाठी कोरोना चाचणी करणं बंधनकारक केलं आहे. त्यानंतर कोरोना चाचणी करण्यासाठी कोविड 19 ची चाचणी करण्यासाठी सेंटरवर शेकडो व्यापाऱ्यांची अचानक गर्दी केली. त्यामुळे डॉक्टरही गांगरुन गेले. डॉक्टरांनी शेकडो व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट करायला असमर्थता दाखवली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

व्यापाऱ्यांनी प्रशासनाने कोरोना टेस्टिंगसाठी व्यवस्था केली नसल्याची तक्रार केली आहे. व्यापाऱ्यांच्या कोरोना टेस्टिंगदरम्यान झालेल्या गदारोळ आणि तक्रार यानंतर महापालिका आयुक्त आणि प्रशासक अस्तिककुमार पांडे यांचं धक्कादायक वक्तव्य समोर आलं आहे. या गोंधळानंतर आयुक्तांनी संतापून फिजीकल डिस्टन्सिंगचा ठेका प्रशासनाने घेतलेला नाही, असं वक्तव्य केलं. तसेच प्रत्येकाच्या मागे मी पोलीस लावू शकत नाही, असंही महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी म्हटलं. आयुक्तांच्या या अजब वक्तव्यावर औरंगाबादमधील व्यापारी आणि नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 82 कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आता औरंगाबादमधील प्रत्येक व्यापारी आणि दुकानदारांची कोरोना टेस्ट केली जाणार आहेत. कोरोना टेस्ट केल्याशिवाय दुकान उघडण्यास बंदी घालण्यात आली (Shopkeeper Corona test Aurangabad) आहे.

कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र दुकानदारांनासोबत बाळगण्याचे बंधन घालण्यात आले आहे. आज (18 जुलै) दुपारपासूनच व्यापारी आणि दुकानदारांच्या मेगा कोरोना टेस्ट करण्यात येणार आहेत. कोरोना टेस्ट नसलेल्या दुकानदारांवर कारवाई केली जाणार आहे. कोरोना टेस्ट निगेटिव्हचे प्रमाणपत्र असलेल्या दुकानदारांकडूनच खरेदी करा, असं आवाहनही प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

हेही वाचा :

औरंगाबादमध्ये प्रत्येक दुकानदाराची कोरोना टेस्ट होणार, टेस्ट न केल्यास दुकान उघडण्यास बंदी

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेनेची सुप्रीम कोर्टात याचिका, युवक काँग्रेसचाही पाठिंबा

आधी मिशन धारावी, आता ध्येय पुणे, पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी इक्बाल सिंह चहल यांची मदत

Dispute in Traders and Doctors on Corona Test

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.