CORONA | औरंगाबादेत कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचा मृत्यू

औरंगाबादेतील शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवे याचा कोरोनामुळे मृत्यू झाला (Aurangabad Corporator Nitin Salve Died Due to Corona)  आहे.

CORONA | औरंगाबादेत कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 07, 2020 | 5:40 PM

औरंगाबाद : महाराष्ट्रात कोरोनाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढत (Aurangabad Corporator Nitin Salve Died Due to Corona) आहे. औरंगाबादमध्ये कोरोनामुळे एका नगरसेवकाचा मृत्यू झाला आहे. नितीन साळवे असे या नगरसेवकाचे नाव आहे. नितीन साळवे हे शिवसेनेचे नगरसेवक होते. दरम्यान आतापर्यंत चार नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

औरंगाबादेतील शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या सात दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते औरंगाबादच्या बालाजी नगर वार्डातून शिवसेनेचे नगरसेवक होते.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

गेल्या काही दिवसांपासून स्थानिक नगरसेवक, आमदार, मंत्री यासारख्या लोकप्रतिनिधींना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दोन आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरसेवकांची नावे

  • औरंगाबाद – नितीन साळवे (शिवसेना)
  • पिंपरी चिंचवड – दत्ता साने (राष्ट्रवादी)
  • ठाणे – मुकुंद केणी (राष्ट्रवादी)
  • मिरा भाईंदर – हरिश्चंद आंमगावकर (शिवसेना)

दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलै रोजी कोरोनानमुळे निधन झाले. साने यांच्या निधनानंतर आज (7 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पिंपरी चिंचवड येथे साने यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पोहोचले. यावेळी शरद पवार यांनी दत्ता साने यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन (Aurangabad Corporator Nitin Salve Died Due to Corona) केले.

संबंधित बातम्या : 

कोरोनामुळे निधन झालेल्या नगरसेवकाच्या घरी शरद पवार, कुटुंबियांचं सांत्वन

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन, बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.