औरंगाबादेत ‘त्या’ रुग्णालयाकडे परवानगी नसताना कोरोनाग्रस्तांवर उपचार, रुग्ण न्याय हक्क परिषदेचा आरोप

औरंगाबादमध्ये ममता हॉस्पिटमध्ये सव्वा लाख रुपयांसाठी रुग्णाचा मृतदेह रोखल्याचा प्रकार उघडकीस आला. (aurangabad mamata hospital covid center)

औरंगाबादेत 'त्या' रुग्णालयाकडे परवानगी नसताना कोरोनाग्रस्तांवर उपचार, रुग्ण न्याय हक्क परिषदेचा आरोप
covid hospital
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 6:22 PM

औरंगाबाद : देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोज हजारो नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी धोका टळलेला नाही. असे असताना कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची लूट केली जात आहे. औरंगाबादमधील बजाजनगर येथील ममता हॉस्पिटमध्ये सव्वा लाख रुपयांसाठी रुग्णाचा मृतदेह रोखल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या रुग्णालयाकडे आवश्यक परवानग्या नसतानाही उपचार केला जात होता, असा आरोप केला जातोय. तशी तक्रार रुग्ण न्याय हक्क परिषदेने केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ममता हॉस्पिटलच्या कोविड सेंटरची मान्यताच रद्द केली आहे. (Aurangabad district collector cancel accreditation of Covid center of Mamata Hospital)

नेमका प्रकार काय ?

राज्यात कोरोनाचे हजारो रुग्ण नव्याने आढळत आहेत. सर्व रुग्णांवर योग्य उपचार व्हावे म्हणून राज्य सरकारने काही खासगी रुग्णालयांना कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर सुरु करण्यास परवानगी दिली आहे. औरंगाबाद येथील बजाजनगरमधील ममता हॉस्पिटललाही कोविड सेंटर सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. या रुग्णालयात अनेक कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. मात्र, उपचार करत असताना या रुग्णालयात एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत रुग्णाचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ममता हॉस्पिटरमध्ये गेले असता, रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृतदेह देण्यात नकार दिला. त्या ऐवजी सव्वा लाख रुपयांच्या बिलाची मागणी केली. बील न दिल्यामुळे रुग्णालयाने कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अडवून ठेवला.

18 तासांत कोविड सेंटरची मान्यता रद्द

बजाजनगरातील ममता हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकाराची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली. सव्वा लाख रुपये न दिल्याने मृतदेह अडवल्यामुळे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या रुग्णालयातील कोविड सेंटरची मान्यता रद्द केली. जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या 18 तासांत हा मोठा निर्णय घेतला.

दरम्यान, ममता हॉस्पिटल प्रशासनाने नियमांपेक्षा जास्त बील आकारल्याचा आरोप मृत रुग्णाचे नातेवाईक तसेच इतर नागरिकांनी केला आहे. याच कारणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ममता हॉस्पिटलच्या कोविड सेंटरची मान्यता रद्द केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे अनेक स्तरातून स्वागत होत आहे.

इतर बातम्या :

बारामती बनावट रेमडेसिव्हीर प्रकरणात डॉक्टरला अटक, 10 टक्के कमिशनवर करायचा टोळीला मदत

पुण्यात म्युकरमायकोसिसचा विळखा, कोरोनामुक्त नागरिकांचं 1 जूनपासून डोअर टू डोअर सर्वेक्षण

(Aurangabad district collector cancel accreditation of Covid center of Mamata Hospital)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.