बारामती बनावट रेमडेसिव्हीर प्रकरणात डॉक्टरला अटक, 10 टक्के कमिशनवर करायचा टोळीला मदत

बारामती बनावट रेमडेसिव्हीर प्रकरणात डॉक्टरला अटक, 10 टक्के कमिशनवर करायचा टोळीला मदत
रेमडेसिव्हीर इंजेक्शन

लोकांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरचाच या प्रकरणात समावेश असल्याचं समोर आल्यानंतर मोठा संताप व्यक्त केला जातोय.

सागर जोशी

|

May 26, 2021 | 5:05 PM

बारामती : बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना बारामतीमध्ये समोर आली. त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता एका डॉक्टरलाच अटक करण्यात आली आहे. यापूर्वी बनावट रेमडेसिव्हीर प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. लोकांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरचाच या प्रकरणात समावेश असल्याचं समोर आल्यानंतर मोठा संताप व्यक्त केला जातोय. महत्वाची बाब म्हणजे हा डॉक्टर 10 टक्के कमीशनवर अर्थात प्रति इंजेक्शन 3 हजार 500 रुपये घेऊन या टोळीला मदत करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. (A doctor arrested in  remedesivir injection case in Baramati)

बारामतीतील बनावट रेमडीसीव्हर प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना बारामती तालुका पोलीसांनी अटक केलीय. या सर्वांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.आता यात भवानीनगर येथील डॉ. स्वप्निल नरुटे याचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी डॉ. नरुटे याला अटक केली आहे. तो बनावट रेमडीसीव्हरची विक्री करण्यास मदत करत होता. यात तो 3 हजार ते 3 हजार 500 रुपये कमीशन घेत असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.

रेमडेसिव्हीरचा काळाबाजार फोफावला

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर केला जात होता. मात्र, राज्यात रेमडेसिव्हीरचाही मोठा तुटवडा भासत होता. अशावेळी रेमडेसिव्हीरचा मोठा काळाबाजार झाल्याचं पाहायला मिळालं. रेमडेसिव्हीरचं एक-एक इंजेक्शन त्यावेळी तब्बल 35 ते 40 हजारापर्यंत विकलं गेलं. तेव्हा बारामतीमध्ये बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करुन त्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. इतकंच नाही तर या बनावट रेमडेसिव्हीरमुळे एका रुग्णाचाही मृत्यू झाला होता.

चौघांना सापळा रचून अटक

बारामतीत दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, प्रशांत घरत आणि शंकर भिसे या चौघांनी बनावट रेमडिसीव्हर इंजेक्शन बनवून त्याची विक्री केली होती. बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचत या चौघांना अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना एकाचा या बनावट औषधामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. या चौघांवर पोलिसांनी कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनावरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर वापरलं जाणार नाही – WHO

कोरोनाचा रुग्ण कितीही गंभीर असला तरी त्याच्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिल्यानंतरही काहीच परिणाम दिसून येत नसल्याचं समोर आल्याचं जागतिक आरोग्य संघनेनं सांगितलंय. रेमडेसिव्हीर इंजेक्शन हे कोरोनावर प्रभावी आहे, असे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत, असं WHO ने म्हटलं आहे. त्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शन आता कोरोना उपचारातून वगळण्यात आल्याची माहिती WHOने दिली आहे.

संबंधित बातम्या :

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार तेजीत, मुंबईसह नागपूर पोलिसांची कडक कारवाई

Remedesivir For Maharashtra : महाराष्ट्राच्या वाट्याला किती रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स? राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण

A doctor arrested in  remedesivir injection case in Baramati

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें