AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद जिल्ह्यात रोहिणी नक्षत्राचा पाऊस बरसला, कच्च्या घरांचं, शेती-फळ पिकांचं नुकसान

औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी अनेक भागात रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील कच्च्या घरांचं, शेती पिकांचं तसेच फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

औरंगाबाद जिल्ह्यात रोहिणी नक्षत्राचा पाऊस बरसला, कच्च्या घरांचं, शेती-फळ पिकांचं नुकसान
पाऊस
| Updated on: May 28, 2021 | 9:11 AM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी अनेक भागात रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील कच्च्या घरांचं, शेती पिकांचं तसेच फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. पावसाने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी देखील शिरलं. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. (Aurangabad District Rain Update Rohini Nakshtra)

जिल्ह्यातील पैठण, खुलताबाद, पाचोड परिसराला सर्वाधिक पावसाचा फटका बसला. पळसवाडी, चित्तेपिंपळगाल, गल्लेबोरगाव, वैजापूर, मनोर येथेही जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यंदा जून महिन्याच्या अगोदर जरी पाऊस पडला असेल तरीही शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणीचं नियोजन करावं, असा आवाहन कृषी अधिकारी हर्षदा जगताप यांनी केलंय.

पैठण आणि पाचोड परिसराला सर्वाधिक पावसाचा फटका

जिल्ह्यातील पैठण आणि पाचोड परिसराला सर्वाधिक पावसाचा फटका बसला. या पावसात अनेक कच्च्या घरांचं नुकसान झालं. पावसाने नागरिकांच्या घरात पाणी देखील शिरलं. तर काहींच्या घरावरील पत्रे उडाले. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

शेतकऱ्यांची तारांबळ, नुकसान आणि मनस्ताप….

शेतकऱ्यांचं या पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांची पिकांचं या पावसात नुकसान झालं. तर या पावसाने फळ पिकांनाही मोठा फटका बसला. अनेक फळ पिकांच्या बागेमध्ये पाणी साचून राहिलं. त्यामुळे शेतकऱ्यांना फळपिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले.

चित्ते पिंपळगावात, वेरुळ, मलकापूर, चिंचोलीत धो धो

चितेपिंपळगाव परिसरात पावसाने गुरुवारी पाचच्या सुमारास चांगलीच हजेरी लावली. जवळपास अर्धा तास पाऊस धोधो बरसला. रोहिणी नक्षत्रातील पहिलाच पाऊस जोरदार झाल्याने या परिसरात मात्र समाधानाचे वातावरण पाहायला मिळालं. वेरूळ परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे या परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने परिसरातील मलकापूर, चिंचोली, माटेगाव, आदी गावांत सुरु असलेल्या खरीप हंगामाची कामं तसेच मशागतीचे कामे खोळंबली.

(Aurangabad District Rain Update Rohini Nakshtra)

हे ही वाचा :

ऊसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाची झुंज अपुरी, डॉ. राहुल पवारचा औरंगाबादेत मृत्यू

औरंगाबादेत ‘त्या’ रुग्णालयाकडे परवानगी नसताना कोरोनाग्रस्तांवर उपचार, रुग्ण न्याय हक्क परिषदेचा आरोप

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.