Maharashtra News LIVE Update | मोठी दुर्घटना ! उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला

| Updated on: May 28, 2021 | 11:24 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | मोठी दुर्घटना ! उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 May 2021 10:34 PM (IST)

    उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला, चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळत थेट तळमजल्यावर आला

    उल्हासनगर :

    उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला

    कॅम्प 2 मधील साई शक्ती या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला

    चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळत कोसळत थेट तळमजल्यावर आला

    आत्तापर्यंत ढिगाऱ्याखालून दोन जणांना बाहेर काढलं

    आणखी काही जण।अडकले असल्याची शक्यता

    इमारतीत एकूण 29 फ्लॅट्स आहेत

    अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू

    ठाणे महापालिकेची टीडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल

    आत्तापर्यंत 5 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे

    आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे

    एनडीआरएफला सुद्धा मेसेज दिला आहे – उल्हासनगर महापालिका आयुक्तांची माहिती

  • 28 May 2021 09:23 PM (IST)

    जालना भाजप कार्यकर्ता मारहाण प्रकरण, पीएसआयसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

    जालना : जालन्यातील भाजप कार्यकर्त्याला केलेल्या मारहाण प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकासह पाच कर्मचार्यांचं निलंबन करण्यात आलंय. भाजपच्या युवा सरचिटनीस शिवराज नरियलवाले यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता. त्यानंतर सर्व स्तरातून याचा निषेध करण्यात आला. त्यातून आज पोलीस निरीक्षकासह पाच कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. पीएसआ भगवत कदम, पोलीस कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळुंखे आणि महेंद्र भारसाकळे अशी निलंबित केलेल्या कर्मचार्यांची नावं आहेत. असं असलं तरी मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचं कधी निलंबन होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.

  • 28 May 2021 09:19 PM (IST)

    भारतात आणखी 3 राफेल लढाऊ विमान दाखल, आतापर्यंत 23 लढाऊ विमानं दाखल

    3 राफेल लढाऊ विमान भारतात दाखल

    आत्तापर्यंत 23 लढाऊ विमानं दाखल

    2022 पर्यंत 36 विमान होणार दाखल

  • 28 May 2021 08:24 PM (IST)

    मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

    महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली

    कोविड काळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावे 5 लाख रुपये मुदत ठेव ठेवून त्यावर येणारे व्याज त्यांना मिळत रहावे

    एक पालक गमावलेल्या बालकांना ‘बाल संगोपन’ योजनेत समाविष्ट करत दरमहा 2500 रुपये मदत मंजूर करावी, अशी मागणी केली

    मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक असून लवकरच कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येईल

  • 28 May 2021 08:18 PM (IST)

    केरळात मान्सूनपूरक स्थिती बनायला सुरुवात, दोन दिवसात मान्सून दाखल होणार

    केरळात मान्सूनपूरक स्थिती बनायला सुरुवात,

    दोन दिवसात मान्सून केरळात होणार दाखल,

    31 तारखेला मान्सून केरळात दाखल होण्याचा हवामान विभागाचं होतं अनुमान,

    31 तारखेलाच मान्सून केरळात होणार दाखल,

    मान्सूनच्या प्रवासानं घेतला वेग बंगालच्या उपसागरातून मान्सूनची केरळाकडे वाटचाल,

    पुणे हवामान वेधशाळेची माहिती

  • 28 May 2021 07:25 PM (IST)

    कल्याण शील रोडवर पाईपलाईन फुटली

    कल्याण शील रोडवर पाईपलाईन फुटली

    कटाई नाकाजवळ एमआयडीसीची पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर नदीचे स्वरूप

    वर्षभरात पाईपलाईन फुटल्याची ही पाचवी घटना

    रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

    बारवी धरणातून नवी मुंबई ठाणे मीरा-भाईंदर याठिकाणी या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होते

  • 28 May 2021 07:20 PM (IST)

    भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण, आघाडी सरकारमुळे अन्याय : रावसाहेब दानवे

    रावसाहेब दानवे ऑन मराठा आरक्षण :

    भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते

    काही लोकांनी धोका दिल्यामुळे आमचे सरकार पडले

    तीन पक्षाच्या सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा समाज मागास कसा हे जबाबदारीने मांडले नाही

    मराठा समाज आरक्षण विषय अशोक चव्हाण यांच्या गळ्यात गुंतवला

    आघाडी सरकारमुळे मराठा समाजावर अन्याय झाला

  • 28 May 2021 07:17 PM (IST)

    कोरोनाच्या काळात चिथावणीखोर वक्तव्य करू नये, दिलीप वळसे पाटील यांची चंद्रकांत पाटलांना सूचना

    पुणे : गृहमंत्री - दिलीप वळसे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    - पदभार स्वीकारल्यावर अधिकाऱ्यांची भेट झाली होती

    - मात्र कार्यालय आणि क्राईम बाबत प्रत्यक्षात आढावा घेतला

    ऑन गुंड रॅली

    - गुंडांची रॅली चुकीची

    - नियम पाळणे गरजेचे आहे

    - त्याबद्दल पोलिसांवर पण कारवाई केली

    पुणे पोलीस बदली अॅप

    - बदलीमध्ये पारदर्शकता आणि वशिलाबाजी होऊ नये याकरिता चांगला निर्णय घेतलाय

    - अंतर्गत बदली करण्यासाठी हे चांगलं पाऊल

    - भविष्यात राज्यात याबाबत विचार करू

    ऑन जालना मारहाण / फडणवीस पत्र

    - जालण्यातील व्हिडीओ बघितला

    - कारवाई दरम्यान जास्तच मारहाण

    - त्या कार्यकर्त्याने ओपीडीपर्यंत दंगा केला होता

    - तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कारवाईच्या सूचना दिल्याय

    ऑन मराठा आरक्षण रद्द

    - सुप्रीम कोर्टात गेल्यावर 3 / 2 असा निर्णय झाला

    - केंद्राने राज्यात याबाबत विचार व्हावा असं म्हंटल होतं

    - मागणी आहे त्यानुसार आरक्षण मिळालं पाहिजे

    ऑन चंद्रकांत पाटील

    - कोरोनाच्या काळात चिथावणीखोर वक्तव्य करू नये

    - सामंजस्य भूमिका घ्यावी

  • 28 May 2021 06:08 PM (IST)

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चालू ट्रकला भीषण आग, ट्रक जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

    विरार : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चालू ट्रकला भीषण आग लागली आहे. आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. विरार हद्दीत खानिवडे टोल नाका येथे गुजरात लेनवर आज 4 च्या सुमारास ही घटना घडली आहे. 16 टायराचा मोठा ट्रक प्लॅस्टिकचे मनी घेऊन गुजरात च्या दिशेने जात होता. इंजिन मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविल्या जात आहे. आगीत जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. वसई विरार महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आग विझवण्यात यश मिळविले आहे..

  • 28 May 2021 04:53 PM (IST)

    सांगली शहरातील चांदणी चौकातील कॅटरेर्सवर सीलची कारवाई

    सांगली -

    शहरातील चांदणी चौकातील ओम शक्ती कॅटरेर्सवर सीलची कारवाई

    लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महापालिका आणि पोलिसांची कारवाई

    मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार कारवाई

  • 28 May 2021 04:04 PM (IST)

    ज्या आशेने आलोय, त्या दिशेने सर्व सुरु : संभाजीराजे

    "मुख्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, कुंभकोणी यांना भेटलो. कायदेशीर चर्चा झाली. मराठा आरक्षण कसं मिळेल यावर चर्चा झाली. अडचणी आहेत पण मार्ग काढता येईल. दुसरी गोष्ट दुसरे सर्व पक्ष एकत्र कसे येतील यावर चर्चा झाली. याशिवाय शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबतही चर्चा झाली. मला वाटतंय ज्या आशेने मी आलोय, त्या दिशेने सर्व सुरु आहे. मी पाच वाजताच्या पत्रकार परिषदेत अधिक भूमिका मांडेन", असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांसोबत जवळपसा 45 मिनिटे बैठक झाली.

  • 28 May 2021 03:38 PM (IST)

    मराठा आरक्षणावरून नाराज असलेल्या संभाजीराजेंना भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांचा सल्ला

    रत्नागिरी :

    मराठा आरक्षणावरून नाराज असलेल्या संभाजीराजेंना भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिला सल्ला

    छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेचे तिकिट दिलं गेलं ते मराठा समाज्याचे नेतृत्व करावं म्हणूनच

    त्यांचा सन्मान ठेवला गेला. छत्रपतींनी मराठा समाज्याच्या बाबतीतील भूमिका सष्ट करावी

    त्यांची जी भूमिका काही दिवसात बदलते ती भुमिका समाज्यांच्या हिताची भुमिका सरकार समोर न्यावी

    छत्रपतींचे वंशज म्हणून ते योग्य निर्णय घेतील

    निर्णय घेताना मराठा समाज्याचा विचार करा, निर्णय़ घेताना स्वार्थ पाहू नका

    छत्रपती संभाजी महाराज हे शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज

    वंशज असल्याने आम्हाला तुमचा अभिमान आहे

    तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल

    मराठा समाज्याला आरक्षण मिळण्यासाठी विविध पक्षाच्या सर्वांना भेटा

    छत्रपीतीबद्दल सर्वांना आम्हाला त्यांचा आदर

    राजिनान्याचा निर्णय़ घेतलेला नाही, त्यामुळे यावर अत्ताच बोलणार नाही- प्रसाद लाड

  • 28 May 2021 03:35 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कामाला फुल स्टॉप

    गडचिरोली जिल्हा रेडझोनमध्ये असून लाकडाऊन असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना काम करणं कठीण होऊन बसलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण गडचिरोली भागात शेतकरी कोणत्या न कोणत्या कामासाठी तेलंगणा राज्य गाठीत असतात तेलंगाना राज्यात कडक लाकडाउन आहे. गडचिरोली जिल्ह्यात कडक लाकडाउन असल्यामुळे नागर दुरुस्ती, ट्रॅक्टर दुरुस्ती, वीज पंप दुरुस्ती,फवारणी पंप दुरुस्ती, शेतकऱ्यांचे नवीन यंत्रसामग्री खरेदी, सोलर पंप दुरुस्ती किंवा खरेदी हे सर्व शेतकऱ्यांच्या कामावर आळा बसलेला आहे. पुढील आठवड्यापासून जून महिना सुरू होत असून शेतकऱ्यांचे कामे जून महिन्यात ना झाली तर पेरणी किंवा रोहिणी करण्यात उशीर होईल.

  • 28 May 2021 03:22 PM (IST)

    छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा, मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित

    खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभीवर आज महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता ते पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्याआधी ते राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. वर्षावर सध्या मुख्यमंत्र्यांसह मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितत तिथे महत्त्वपूर्ण बैठक सध्या सुरु आहे.

  • 28 May 2021 03:18 PM (IST)

    वर्षा बंगल्याबाहेर मराठा समन्वयक, कार्यकर्ते आक्रमक

    - मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम राज्यातील सर्व पक्षांनी केलंय - भाजपची भूमिका ही चालढकल करण्याची आहे. समाज आता यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. - एक वेगळं संघटन असावं, एक वेगळा पक्ष असावा, अशी समाजाची भावना आहे. आरक्षण मिळण्यासाठी हा लढवय्या समाज आक्रमक होईल.

  • 28 May 2021 03:08 PM (IST)

    मनमाडसह नाशिक ग्रामीणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

    मनमाड:- मनमाडसह नाशिक ग्रामीणच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी.

    वादळीवारा आणि मेघगर्जनेसह पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

    अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी,नागरिकांची उडाली तारांबळ..खळ्यात-मळ्यात उघडयावर असलेला कांदा भिजल्यामुळे झाले नुकसान..गेल्या काही दिवसा पासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे मिळाला दिलासा

  • 28 May 2021 01:03 PM (IST)

    भिवंडीत एका घराला आग, दोन तासाने आगीवर नियंत्रण

    भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत एक मजली कौलारू घरास लागली भीषण आग .

    आगीत संपूर्ण घर जाळून खाक .

    दोन तासाने अग्निशामक दलाने आगीवर मिळविले नियंत्रण .

  • 28 May 2021 12:18 PM (IST)

    नारायण राणे आज मालवण दौऱ्यावर, नुकसानग्रस्त किनारपट्टी भागाला भेट देणार

    सिंधुदुर्ग:-

    नारायण राणे आज करणार मालवणचा दौरा.

    तौक्ते चक्रीवादळात नुकसानग्रस्त किनारपट्टी भागाला देणार भेट.

    मालवण मधील देवबाग, वायरी गावांत नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी.

  • 28 May 2021 12:17 PM (IST)

    शासनाने आर्थिक मदत करा, घोडे व्यवसायिकांचा इंदापूर तहसील कचेरीवर घोड्यासह मोर्चा

    घोडे व्यवसायिकांचा इंदापूर तहसील कचेरीवर घोड्यासह मोर्चा... लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या घोडे व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदत करावी व इतर मागण्यासाठी अनोखा मोर्चा... पीपल्स रिपब्लिकन पक्ष व घोड़े व्यवसायिकांनी काढला मोर्चा... इंदापूर नगरपालिका ते प्रशासकीय भवन असा निघाला मोर्चा... मोर्च्यात 25 हून अधिक घोड्यांचा समावेश.. प्रशासकीय भवनासमोर घोड्यांचे नाचकाम सुरु...

  • 28 May 2021 10:35 AM (IST)

    मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, कोल्हापुरात मराठा समाजाचं धरण आंदोलन

    कोल्हापूर

    कोल्हापुरात आज मराठा समाजाच धरण आंदोलन

    आरक्षणा विषयासाठी विधानसभेच विशेष अधिवेशन बोलविण्याची प्रमुख मागणी

    आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील देखील सहभागी होणार

    कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात होणाऱ्या आंदोलनात समाज बांधव काळ्या फिती लावून होणार

  • 28 May 2021 10:34 AM (IST)

    गडचिरोलीत डासांचा हैदोस वाढला, प्रतिबंधात्मक धूर फवारणीकडे शासनाचे दुर्लक्ष

    गडचिरोली जिल्ह्यात महामारीत डासाच्या वाढता हैदोस

    गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात घाणीमुळे डासाच्या प्रभाव वाढत आहे

    या डासामुळे अनेक आजार समोर येत आहेत

    प्रतिबंधात्मक धूर फवारणी कडे शासनाचे दुर्लक्ष

    कोरोणा आजारात दुसऱ्या आजाराकडे दुर्लक्ष डेंगू मलेरिया सारखे मोठे आजारही गायब,

    फवारणी केल्यास अनेक आजाराने बसणार आळा जिल्हा आरोग्य यंत्रणा सुस्त गडचिरोली

  • 28 May 2021 10:33 AM (IST)

    साताऱ्यात घंटागाडी चालक आणि हेल्पर यांचे सकाळपासून कामबंद आंदोलन

    सातारा : साताऱ्यात घंटागाडी चालक आणि हेल्पर यांचे सकाळपासून काम बंद आंदोलन

    घंटागाडय़ावरील कामगार व हेल्पर यांचे पगार वेळेत मिळावेत तसेच कोरोना प्रतिबंधक सुरक्षा साधने मिळावीत या मागणीसाठी सुरु केले कामबंद आंदोलन

    सातारा शहरातील घन कचरा गोळा करणाऱ्या सुमारे 40 ते 45 घंटागाडय़ावरील कामगार व हेल्पर कामबंद आंदोलनात सहभागी

  • 28 May 2021 10:32 AM (IST)

    कल्याणमध्ये फेरीवाल्याकडून महापालिकेच्या फेरीवाला पथकावर हल्ला, गुन्हा दाखल

    कल्याण : लॉकडाऊन काळात सकाळी 11 नंतर हातगाड्यांवर विक्री करण्यास बंदी असताना देखील कल्याण पश्चिम नजीक मोहने लहुजी नगर परिसरात फेरीवाल्यांना आपले बस्तान मांडले होते .गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे पथक या ठिकाणी कारवाईसाठी गेले असता फेरीवाल्यांनी महापालिकेच्या फेरीवाला पथकातील कर्मचाऱ्यांशी अरेरावी केली. तसेच त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या घटनेत पालिकेच्या गाडीच्या काचा फुटल्या. तर फेरीवाले पथकातील कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत

  • 28 May 2021 10:29 AM (IST)

    साताऱ्यात घंटागाडी चालक व हेल्पर यांचे सकाळपासून काम बंद आंदोलन

    सातारा

    साताऱ्यात घंटागाडी चालक व हेल्पर यांचे सकाळपासून काम बंद आंदोलन

    घंटागाडय़ावरील कामगार व हेल्पर यांचे पगार वेळेत मिळावेत तसेच कोरोना प्रतिबंधक सुरक्षा साधने मिळावीत या मागणीसाठी सुरु केले कामबंद आंदोलन

    सातारा शहरातील घन कचरा गोळा करणाऱ्या सुमारे 40 ते 45 घंटागाडय़ावरील कामगार व हेल्पर कामबंद आंदोलनात सहभागी

  • 28 May 2021 09:37 AM (IST)

    सांगली जिल्ह्यातील जादा दराने खत विक्री करणाऱ्या 33 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

    सांगली -

    सांगली जिल्ह्यातील जादा दराने खत विक्री करणाऱ्या 33 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

    जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्ततोळी याची कारवाई

    जुन्या दरानेच खत विक्री करण्येचे दिले आदेश

    33 जणांना नोटीस बजावून पुढील कारवाई सुरू केले आहे

  • 28 May 2021 09:23 AM (IST)

    एटीएम सिस्टीम हॅक करुन बॅंकेची फसवणूक करणाऱ्या नायझेरीयन दोन तरुणांना अटक

    पुणे

    एटीएम सिस्टीम हॅक करुन बॅंकेची फसवणूक करणाऱ्या नायझेरीयन दोन तरुणांना अटक

    पुणे सायबर पोलिसांच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 7 मोबाईल, 3 लॅपटॉप, दुचाकी असा ऐवज करण्यात आला जप्त

    डेव्हीड चार्लस (वय 30), केहिंडे सादिक इदरिस (वय 29, रा. उंड्री ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे

  • 28 May 2021 09:22 AM (IST)

    शुल्क नाही भरले म्हणून विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज घडविणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई

    नागपूर  -

    शुल्क नाही भरले म्हणून विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज घडविणाऱ्या महाविद्यालय वर होणार कारवाई

    नागपूर विध्यपीठा ने दिला इशारा

    थकीत शुल्क भरण्यासाठी कोरोना परिस्थिती मुळे अनेक विध्यार्थ्यांना अडचण येत आहे

    अश्या विधर्थ्यांना थांबवू नये , टप्प्या टप्प्याने भरण्याची सुविधा द्यावी

    सिनेट सदश्यां कडून आल्या होत्या विध्यपीठा कडे तक्रारी

    कोणताही विध्यर्थी परिक्षे पासून वंचित राहू नये या साठी विद्यापीठ करत आहे प्रयत्न

  • 28 May 2021 09:20 AM (IST)

    नॅशनल अँटिकरप्शन कमिटीच्या नावाने दमदाटी करत पैसे उकळणाऱ्या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश

    गुहागर - नॅशनल अँटिकरप्शन कमिटीच्या नावाने दमदाटी करत पैसे उकळणाऱ्या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश

    चिपळूण तालुक्यातील हे तीन जण रहिवाशी

    गुहागर तालुक्यातील बार मालकांना या कमिटीच्या नावाने धमकावत असून पैसे उकळताना पकडले

    यामध्ये एका माजी सैनिक अधिकारीअसलेल्या व्यक्तीचा समावेश

    गुहागर पोलीस घटनास्थळी अधिक तपास सुरू

  • 28 May 2021 09:20 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगेना भोसरी पोलिसांच्या ताब्यात

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगेना भोसरी पोलिसांच्या ताब्यात

    -पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री केल्याचा त्यांच्यावर ठपका

    -जमीन खरेदी करणाऱ्यांपैकी मनोज शर्मा ही ताब्यात तर रविकांत ठाकूरचा शोध सुरू

    -या नगरसेवकाने पॉवर ऑफ अटर्नी, ताबा पावती केल्याचे समोर,त्यानुसार भोसरी पोलिसांनी या नगरसेवकाला घेतले ताब्यात

    -शहर सुधारणा समितीचे सभापतीपद, स्थायी समितीचे सदस्यत्व या नगरसेवकाने भूषविले आहे

  • 28 May 2021 09:19 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यावर धारधार शस्त्राने वार करीत डोळे फोडले

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड मधील सांगवी भागात धक्कादायक प्रकार उघडकीस

    -भटक्या कुत्र्यावर धारधार शस्त्राने वार करीत फोडले डोळे

    -ह्या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    -फिर्यादी अक्षय म्हसे हे सांगवी भागातील भटक्या कुत्र्यांना दररोज अन्न देत असतात,त्यादरम्यान ह्या कुत्र्यावर कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीने वार करत डोळे फोडल्याची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी जात त्या कुत्र्याला रुग्णालयात दाखल केले आहे

    -ह्या घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत

  • 28 May 2021 08:18 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात आणखी एक बालविवाह रोखण्यात यश आलं

    नागपूर -

    नागपूर जिल्ह्यात आणखी एक बालविवाह रोखण्यात यश आलं

    नवी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत काल पार पडणार होता बालविवाह

    बाल सौरक्षण समिती आणि पोलिसांनी लग्न लागण्याच्या आधीच थांबविला विवाह

    वधू 17 वर्षाची तर वर 18 वर्षाचा असून त्यांचा विवाह होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने आलं यश

    लग्नाची सगळी तयारी करून मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार होता विवाह सोहळा

    या आधी 24 तारखेला सुद्धा थांबविण्यात आला होता एक बालविवाह

  • 28 May 2021 07:33 AM (IST)

    नागपूर महापालिका आर्थिक अडचणीत, घर टॅक्स, पाणी पट्टीची 850 कोटींची थकबाकी

    नागपूर -

    नागपूर महापालिका आर्थिक अडचणीत

    घर टॅक्स ,पाणी पट्टी ची 850 कोटींची थकबाकी

    कोरोना संकटाचा फटका , अभय योजना राबवून सुद्धा विशेष फायदा नाही

    मालमत्ता कर विभागातील अनेक अधिकारी कोरोना नियंत्रणा साठी।लागण्याल्याने कर वसुली कडे दुर्लक्ष

    मालमत्ता कराची थकबाकी 650 कोटी ... तर पाणी कराची थकबाकी 200 कोटी रुपये आहे

    महापालिके समोर कर वसुली च मोठं आवाहन ..

  • 28 May 2021 07:14 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटक, जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस

    औरंगाबाद ब्रेकिंग-

    औरंगाबाद जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका

    काल औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात कोसळला अवकाळी पाऊस

    अनेक ठिकाणी कच्च्या घरांचे झाले अतोनात नुकसान

    तर शेती पिकांचे आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

    औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण आणि पाचोड परिसराला बसला सर्वात जास्त फटका

    अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याने झाली तारांबळ

  • 28 May 2021 07:04 AM (IST)

    मुंबई-आग्रा महामार्गावर नादुरुस्त ट्रकला भीषण आग

    - मुंबई-आग्रा महामार्गावर नादुरुस्त ट्रकला भीषण आग

    - पिंपळगाव बसवंत टोल नाक्याजवळील कोकणगाव येथील साकोरे फाट्यावरील घटना

    - आगीत पुठ्याने भरलेला ट्रक जळून खाक

    - आगीत ट्रक व पुठ्ठा जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान

    - आग इतकी भीषण होती की पिंपळगाव बसवंत अग्निशमन दलाच्या एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात अली नाही

    - अचानक आग लागल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा

    - नादुरुस्त ट्रकला आग लागल्याचे कारण अस्पष्ट जरी असेल मात्र मुदामून कोणीतरी आग लावल्याचे बोलले जात आहे

  • 28 May 2021 07:02 AM (IST)

    संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

    पुणे -

    संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन कण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी बैठक

    या बैठकीत पालखी सोहळ्याबाबत काय निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

    यंदाही पालखी सोहळ्यावर कोरोनाचं सावट, गेल्यावर्षी पायी वारी सोहळा करण्यात आला होता रद्द

    यंदा मात्र, पायी वारी सोहळा रद्द करण्यास काही वारकऱ्यांचा विरोध, निर्बंध झाला पण सोहळा रद्द करु नका अशी वारकऱ्यांची मागणी

    त्यामुळं आज दुपारी होणाऱ्या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष

Published On - May 28,2021 11:23 PM

Follow us
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.