AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | काँग्रेस-राष्ट्रवादीचे कपडे काढले तर आतून RSS चे लोक सापडतील, औरंगाबाद नामांतरावरून खा. इम्तियाज जलील आक्रमक

खा. जलील म्हणाले, 'या शहराचं नाव बद्दलण्याआधी विकास करणार असे सांगितले होते मग एक महिन्यात काय जादूची कांडी फिरली की शहराचं नाव बदललं..?

Aurangabad | काँग्रेस-राष्ट्रवादीचे कपडे काढले तर आतून RSS चे लोक सापडतील, औरंगाबाद नामांतरावरून खा. इम्तियाज जलील आक्रमक
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 11:34 AM
Share

औरंगाबादः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकांना उल्लू बनवत आहेत. या लोकांचे कपडे काढले तर आतून RSS चे लोक सापडतील, अशी जहरी टीका खा. इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केली आहे. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी (Shivsena CM) संभाजीनगरचा प्रस्ताव मंजूर केला त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्रीदेखील होते. मात्र त्यांनी या विषयावर मौन बाळगल्यामुळे एमआय़एम आणि अनेक सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत. आज या नामांतराविरोधात औरंगाबादमध्ये मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. आजच्या मोर्चात किती लोक येतील माहिती नाही, मात्र मी एकटा यात सहभागी होणार असून या निर्णयाला तीव्र विरोध करणार आहे. निदान पुढच्या पिढीला माझा विरोध होता, हे कळेल, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

‘काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार’

औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याचा शिवसेनेचा अनेक वर्षांपासूनचा अजेंडा आहे. मात्र राज्यात शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना हा निर्णय कसा घेतला गेला, यावरून खासदार जलील आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले, ‘काँग्रेस राष्ट्रवादीने लोकांना उल्लू बनवण्याचे काम सुरू केले आहे. यांचे जर कपडे काढले तर यांच्या आतून पण आर एस एस चे लोक सापडतील.. अशी प्रतिक्रिया खा. जलील यांनी दिली आहे. नामांतराचा प्रस्ताव एवढ्या तडकाफडकी मंजूर होण्यासाठी त्यावेळी मंत्रिमंडळात गप्प बसलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री असल्याचा आरोप खा. जलील यांनी केल आहे.

शरद पवार म्हणजे झूठ बोले कौआ काटे…

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेने आम्हाला विश्वासात न घेता नामांतराचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना खासदार जलील म्हणाले, ‘ शरद पावर यांनी संभाजीनगर नावाचे समर्थन केले होते आणि आता ते विरोध करत असल्याचं सांगत आहेत. हे झूट बोले कव्वा काटे असा प्रकार आहे…’

शिवसेनेना विकास करणार होती ना…?

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी असताना औरंगाबादेत मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. मागील महिन्यात झालेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतराच्या मुद्द्यावरून भाष्य केलं होतं. आधी शहराला रस्ते, पाणी आणि विकासाच्या सुविधा प्रदान करू आणि मगच नामांतराचा निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणार असल्याचं चित्र दिसताच त्यांनी नामांतराचा निर्णय घेतला. यावर बोलताना खा. जलील म्हणाले, ‘या शहराचं नाव बद्दलण्याआधी विकास करणार असे सांगितले होते मग एक महिन्यात काय जादूची कांडी फिरली की शहराचं नाव बदललं..?

‘नाव बदलण्यासाठी 1 हजार कोटी खर्च’

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर केलं तर सर्व नागरिकांच्या सर्व कागदपत्रांवर संभाजीनगर हे नाव करावं लागेल. सर्व सरकारी कार्यालयांतूनही हा बदल करावा लागेल. या बदलासाठी लोकांना अनेक दिवस रांगेत उभे राहावे लागेल. एवढंच नाही तर यासाठी तब्बल 1 हजार कोटी रुपये खर्च येऊ शकतो, मग हा खर्च कोण देणार, असा सवाल खा. जलील यांनी केलाय.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.