युतीची शोकांतिका! बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी एकही ठेकेदार मिळेना

औरंगाबाद : शिवसेना-भाजप युतीच्या राज्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबतची शोकांतिका समोर आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी एकही ठेकेदार पुढे येईना झाला आहे. औरंगाबाद महापालिकेने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 48 कोटींची निविदा काढली आहे. पण ती निविदा एकाही ठेकेदाराने भरलेली नाही. किंबहुना एकही ठेकेदार त्यासाठी उत्सुक नाही. निविदा भरण्यासाठी एकही ठेकेदार पुढे …

युतीची शोकांतिका! बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी एकही ठेकेदार मिळेना

औरंगाबाद : शिवसेना-भाजप युतीच्या राज्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबतची शोकांतिका समोर आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी एकही ठेकेदार पुढे येईना झाला आहे. औरंगाबाद महापालिकेने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 48 कोटींची निविदा काढली आहे. पण ती निविदा एकाही ठेकेदाराने भरलेली नाही. किंबहुना एकही ठेकेदार त्यासाठी उत्सुक नाही.

निविदा भरण्यासाठी एकही ठेकेदार पुढे न आल्याने अखेर औरंगाबाद महापालिकेला निविदेसाठी मुदतवाढ द्यावी लागली. मात्र मुदतवाढ देऊनही ठेकेदार पुढे येईनात.

विशेष म्हणजे ज्या औरंगाबाद महापालिकेने ही निविदा काढली आहे, त्या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तब्बल 17 एकर जागेत 93 फूट उंचीचा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करत. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक औरंगाबादला संभाजीनगर म्हणूनच ओळखतो. बाळासाहेबांच्या अनेक सभा औरंगाबादेत गाजल्या. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे औरंगाबादची खासदारकी भूषवत आहेत.

बाळासाहेबांच्या निधनानंतर औरंगाबाद महापालिकेने त्यांचं भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी शिवसेनेचे त्र्यंबक तुपे महापौर होते. महापालिकेच्या जागेवर एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मृतीवन आणि स्मारक उभारण्याचे ठरवण्यात आले होते. त्यावेळी तत्कालिन पालकमंत्री रामदास कदम यांनी या स्मारकासाठी सरकारकडून 5 कोटींचा निधी मंजूर केला. शिवाय आणखी निधीची ग्वाही दिली होती. मात्र अद्याप या स्मारकाची एकही वीट रचण्यात आलेली नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *