औरंगाबादेत कुठे करणार बाप्पांचे विसर्जन? महापालिकेने जारी केली झोननिहाय मूर्ती संकलन केंद्राची यादी

शहरातील 40 केंद्रांवर महापालिकेची वाहने उभी असतील. सर्व गणेशमूर्ती संकलित केल्यानंतर, महापालिकेने व्यवस्था केलेल्या गणेश विसर्जन केंद्रावर मूर्तींचे विसर्जन केले जाईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

औरंगाबादेत कुठे करणार बाप्पांचे विसर्जन? महापालिकेने जारी केली झोननिहाय मूर्ती संकलन केंद्राची यादी
औरंगाबाद महापालिकेने गणेश मूर्ती संकलनाच्या 40 केंद्रांची यादी जारी केली आहे.
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 7:59 PM

औरंगाबाद: दहा दिवस गजाननाच्या आगमनाने घरोघरी अन् प्रत्येक नगरात आनंद उत्साहाचं वातावरण तयार झालंय. यंदा गणपतीच्या आगमनाला तर कोरोनानंही आपला पसारा काहीसा आवरता घेतलाय. अगदी सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पांनाही विराजमान होता आलं. मात्र आता गणेशोत्सवाचे (Ganesh Festival) दिवस संपत आले आहेत. भक्तांच्या लाडक्या गणरायाच्या विसर्जनाची तयारीही करायला हवी.  पर्यावरणपूरक  गणेशोत्सव (Echo Friendly Ganeshotsav) साजरा करण्याच्या उद्देशाने अनेकांनी यंदा शाडूच्या गणेशमूर्ती घरी बनवल्या किंवा खरेदी करतानाही शाडूच्या मूर्ती खरेदी केल्या. अशा शाडूच्या मूर्ती घरगुती पद्धतीने कुंडीत विसर्जित केल्या जातात.  मात्र पीओपीच्या (POP Ganesh Idol) मूर्ती कुठे विसर्जित करायच्या, हा प्रश्न आहे. याकरिता औरंगाबाद महानगरपालिकेने गणेश मूर्ती संकलनाची यादी जारी केली आहे.

नागरिकांनी केंद्रावरच मूर्ती जमा करण्याचे आवाहन

महानगरपालिकेने शहरातील 9 झोनमधील महत्त्वाच्या ठिकाणी विसर्जनासाठीच्या गणेशमूर्ती संकलित केल्या जातील. तरीही शहरातील नागरिकांनी जवळपासच्या विहिरी, तलाव याठिकाणी मूर्ती विसर्जित न करता पालिकेच्या संकलन केंद्रावरच मूर्ती जमा कराव्यात असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. या केंद्रांवर महापालिकेची वाहने उभी असतील. सर्व गणेशमूर्ती संकलित केल्यानंतर, महापालिकेने व्यवस्था केलेल्या गणेश विसर्जन केंद्रावर मूर्तींचे विसर्जन केले जाईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच विसर्जनाच्या दिवशी कोव्हिड नियमांचे पालन अवश्य करण्याच्या सूचनाही पालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत.

विसर्जनासाठी झोननिहाय 40 केंद्र पुढीलप्रमाणे- 

  • झोन 1- खडकेश्वर महादेव मंदिराजवळ, माजी नगरसेवक श्री पांडे यांच्या घराजवळ बेगमपुरा, संत विश्राम बाबा शाळेजवळ नंदनवन कॉलनी, वाणी कॉम्प्लेक्स जवळ पढेगाव, गांधी पुतळ्या जवळ.
  • झोन 2- शहागंज चमन,गुलमंडी पार्किंग,सावरकर चौक, समर्थनगर.
  • झोन 3- साखरे मंगल कार्यालय समोर,पोलीस कॉलनी सभागृह जवळ.
  • झोन 4- शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ टीव्ही सेंटर चौक, सेंट्रल जेल समोर जाटवाडा रोड,स्मृतिवन गार्डन जवळ हर्सूल तलाव,एसबीओ शाळेजवळ मयुर पार्क.
  • झोन 5- रामलीला मैदान एन 7,राजीव गांधी मैदान एन 5,चिकलठाणा आठवडी बाजार,गरवारे स्टेडियम.
  • झोन 6- मुकुंदवाडी बस स्टॉप ,कामगार चौक एन 2 ,डॉ आंबेडकर चौक चिकलठाणा,रामनगर चौक एन 2 सिडको.
  • झोन 7- कॅनॉट गार्डन परिसर टाऊन सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक गारखेडा, विजयनगर चौक,सूतगिरणी चौक,विसर्जन विहीर शिवाजी नगर,हनुमान चौक,हनुमान नगर पाणी टाकी जवळ,रिद्धी सिद्धी हॉल समोर उल्का नगरी.
  • झोन 8- 106 कंचनवाडी/नक्षत्रवाडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, 110 मयूरबन कॉलनी ,जबिंदा लॉन्स जवळ,114 देवळाई चौक देवळाई, 114,115 देवळाई सातारा,रेणुकामाता मंदिर कमान ,115 सातारा ,सातारा मुख्य गाव विसर्जन विहीर.
  • झोन 9- ज्योतिनगर अंतर्गत पाण्याच्या टाकी जवळ,क्रांती चौक अंतर्गत संत एकनाथ रंग मंदिर,उस्मानपुरा, रेल्वे स्टेशन मुख्य रस्ता कर्णपुरा इतर बातम्या- Aurangabad Top 5: आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, जाणून घ्या औरंगाबादच्या पाच महत्त्वाच्या बातम्या, मोजक्या शब्दात  Aurangabad Gold: सोनं आजही घसरणीवरच, पाच महिन्यातील निचांकी स्तर गाठला, जाणून घ्या शहरातले भाव
Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.