AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | दारू पितो म्हणून पत्नीनं घरात घेतलं नाही, बसखाली येऊन झोपला, सकाळी बस सुरू झाली अन्…

रवी हा घरातून निघाल्यावर मुकुंदवाडीतील झेंडा चौकासमोरील रस्त्याजवळ पार्क केलेल्या गाडीखाली झोपला होता. ती गाडी पाटील ट्रान्सपोर्टची होती. सकाळी कंपनीतील शिफ्ट चेंज होत असल्यामुळे कामगारांना आणण्यासाठी चालक गणेश राठोड गाडी सुरु करून घेऊन गेला.

Aurangabad | दारू पितो म्हणून पत्नीनं घरात घेतलं नाही, बसखाली येऊन झोपला, सकाळी बस सुरू झाली अन्...
| Updated on: Feb 26, 2022 | 11:34 AM
Share

औरंगाबादः दारू पिऊ नको, असं वारंवार सांगितल्यानंतरही पती दारू पिऊन आला. त्यामुळे चिडलेल्या पत्नीनं (Wife) त्याला घरात घेतलं नाही. त्यामुळे नशेतच हा कामगार माघारी फिरला आणि एका बसच्या खाली जाऊन झोपला. खासगी कंपनीची ही बस होती. सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली अन् मोठा घात झाला. बसखाली झोपलेला कामगार चिरडला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबादमधील (Aurangabad Accident) मुकुंदवाडी (Mukundwadi) परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी गाडी चालकाला अटक केल्याची माहिती मिळाली आहे.

वादानंतर निघून गेला- पोलिसांचा संशय

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी किशोर मगरे असं या कामगाराचं नाव आहे. रवीला दारुचे प्रचंड व्यसन होते. त्याच्या व्यसनामुळे पत्नीने राज नगरातील माहेर गाठले होते. गुरुवारी रात्रीही तो दारू पिऊन पत्नी जिथे होते, त्या ठिकाणी गेला. मात्र पत्नीने त्याला घरात घेतले नाही. त्यामुळे तो पुण्याला जात असल्याचे सांगून निघाला. तेथून तो वाहनाखाली येऊन झोपला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळी बस सुरु झाली अन्…

रवी हा घरातून निघाल्यावर मुकुंदवाडीतील झेंडा चौकासमोरील रस्त्याजवळ पार्क केलेल्या गाडीखाली झोपला होता. ती गाडी पाटील ट्रान्सपोर्टची होती. सकाळी कंपनीतील शिफ्ट चेंज होत असल्यामुळे कामगारांना आणण्यासाठी चालक गणेश राठोड गाडी सुरु करून घेऊन गेला. त्याच वेळी गाडीखाली झोपलेला रवी हा मागच्या टायरखाली आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी येणाऱ्या-जाणाऱ्यांना मृतदेह दिसल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सदर गाडी चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तेव्हा चाकाखाली कुणीतरी झोपलं असावं, असं लक्षात आल्याची कबुली दिली.

इतर बातम्या-

Viral video : फुग्यासोबत कुत्र्याचा अनोखा खेळ, यूझर्स म्हणतायत, लहानपणीची आठवण झाली!

पुणेकर खूपच हुशार, लगेच कोर्टात जातात, पण पिंपरीत…, अजित पवारांची टोलेबाजी

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.