AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेतून आजपासून दिल्ली, मुंबईसाठी दररोज फ्लाइट, येत्या 15 दिवसांत आणखी विमानांचे उड्डाण!

प्रवासी संख्या वाढू लागल्यानंतर मार्चअखेरीस आणखी उड्डाणे सुरु होण्याची शक्यता आहे. येत्या 15 दिवसात बंगळुरुसाठीही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे.

औरंगाबादेतून आजपासून दिल्ली, मुंबईसाठी दररोज फ्लाइट, येत्या 15 दिवसांत आणखी विमानांचे उड्डाण!
प्रतिनिधिक फोटो Image Credit source: TV9
| Updated on: Mar 01, 2022 | 1:03 PM
Share

औरंगाबादः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे औरंगाबादमधून (Aurangabad Airport) इतर शहरांत जाणाऱ्या विमानसेवेवरही परिणाम झाला होता. इंडिगोने (Indigo) जवळपास 33 उड्डाणे रद्द केली होती. त्यामुळे औरंगाबादहून दिल्ली, मुंबईला फक्त एअर इंडियाचीच (Air India) उड्डाणे सुरु होती. प्रवासी संख्या घटल्यामुळे कंपनीने काही विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या फार लक्षणीय नसल्यामुळे मार्च महिन्यापासून उड्डाणे पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसात प्रवासी संख्या वाढल्यास बंगळुरूसाठीदेखील उड्डाण सुरु करण्यात येईल, असे संकेत विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

1 मार्चपासून पाच उड्डाणे सुरु

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यामुळे औरंगाबादमधील चिकलठाणा विमानतळावरून 1 मार्चपासून दिल्ली, मुंहई आणि हैदराबादसाठी एकूण पाच उड्डाणे सुरु होत आहेत. इंडिगोची तीन तर एअर इंडियाची दोन विमाने दुपार आणि संध्याकाळ्चया सत्रात उड्डाणे घेतील. त्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे मुंबई- संध्याकाळी 7.00 वाजता इंडिगोचे फ्लाइट दिल्ली- संध्याकाळी 7.30 वाजता इंडिगोचे फ्लाइट मुंबई- रात्री 8.30 वाजता एअर इंडियाचे फ्लाइट हैदराबाद- संध्याकाळी 5.10 वाजता इंडिगोचे फ्लाइट दिल्ली- संध्याकाळी 5.20 वाजता एअर इंडियाचे फ्लाइट

मार्च अखेरीस आणखी उड्डाणे वाढतील

प्रवासी संख्या वाढू लागल्यानंतर मार्चअखेरीस आणखी उड्डाणे सुरु होण्याची शक्यता आहे. येत्या 15 दिवसात बंगळुरुसाठीही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. कोरोना लाटेपूर्वी दररोज 12 विमाने औरंगाबादमधील विमानतळावर ये-जा करत होती. विमानतळ प्राधिकरणाचे संचालक डी.जी. साळवे म्हणाले, पुढील काळात सर्वकाही सुरळीत राहिल्यास विमानांची संख्या वाढू शकते.

इतर बातम्या-

IPL 2022: RCB अजूनही कॅप्टनशिपच्या गोंधळात, विराट कोहली की, दिनेश कार्तिक कोण होणार कर्णधार?

Russia Ukraine crisis: कीव शहरावर हल्ला करण्याची रशियन सैन्याची तयारी

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.