औरंगाबादेत शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

आजपासून औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले आहेत. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिली ते 12 वी पर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली  आहे (Aurangabad Collector Sunil Chavan Said Schools Open For Teachers In Aurangabad).

औरंगाबादेत शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती
School teacher
दत्ता कानवटे

| Edited By: Nupur Chilkulwar

Jun 16, 2021 | 12:04 PM

औरंगाबाद : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या (Corona Second Wave) लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनलॉकच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यामुळे आजपासून औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले आहेत. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिली ते 12 वी पर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली  आहे (Aurangabad Collector Sunil Chavan Said Schools Open For Teachers In Aurangabad).

शाळेत पहिली ते 9 वी पर्यंतच्या शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती राहणार आहे. तर 10 वी आणि 12 वीच्या शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती राहणार आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच, औरंगाबाद जिल्ह्यात लवकरच शाळा सुरु केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वर्षभरापासून प्रत्यक्ष शाळांचे वर्ग भरलेले नाहीत. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.

औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा – जिल्हाधिकारी

नुकतंच औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार, प्रत्येक शाळेत शाळा नियोजन समितीची बैठक घ्या, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच शाळा निर्जंतुकीकरण कारण्यासोबत हात धुणे, सॅनिटायझर वापरण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाने आदेश दिल्या जात आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.

Aurangabad Collector Sunil Chavan Said Schools Open For Teachers In Aurangabad

संबंधित बातम्या :

राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात, कोरोनामुळे शाळा सुरु करणे शक्य नाही- वर्षा गायकवाड

औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें