औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर शिवसेना-भाजप युतीचा झेंडा

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. निकालानंतर शिवसेना-भाजप युतीने विजय मिळवत युतीचा झेंडा फडकविला आहे. अब्दुल सत्तार आणि हरिभाऊ बागडे गटाने 14 पैकी 14 जागा जिंकत शिवसेना-भाजप गट विजयी झाला. तर विरोधी छुप्या कॉंग्रेस गटाचा सुफडासाफ झाला आहे. दूध संघाच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले होते.

औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर शिवसेना-भाजप युतीचा झेंडा
Haribhau Bagade
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 2:15 PM

औरंगाबादः औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीकडे (Election) साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. निकालानंतर शिवसेना-भाजप (Shivsen-Bjp) युतीने विजय मिळवत युतीचा झेंडा फडकविला आहे. अब्दुल सत्तार आणि हरिभाऊ बागडे गटाने 14 पैकी 14 जागा जिंकत शिवसेना-भाजप गट विजयी झाला. तर विरोधी छुप्या कॉंग्रेस (Congress) गटाचा सुफडासाफ झाला आहे. दूध संघाच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले होते.

राज्यातील सेना-भाजप युतीसाठी आग्रही असलेल्या अब्दुल सत्तार यांनी भाजपला सोबत घेऊन दूध संघावर आपली सत्ता आणली आहे. औरंगाबाद तालुका मतदार संघातून संघाचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या विरूद्ध कॉंग्रेसचे सुरेश पठाडे यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती.

महिला मतदार संघासाठी प्रतिष्ठा पणाला

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत महिलांच्या राखीव मतदार संघातील दोन जागांसाठीही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. आमदार हरिभाऊ बगाडे यांच्या पॅनलच्या अलका डोणगावकर आणि शीलाबाई कोळगे यांची लढत शारदा गीते आणि रुक्मिणीबाई सोनवणे यांच्यात झाली होती.

शंभर टक्के मतदान

मागील वेळेप्रमाणेच यावेळीही संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.  औरंगाबादच्या दूध संघासाठी सहा मतदान केंद्रावर शांततेत शंभर टक्के मतदान झाले होते. औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्यानिमित्ताने सहकार क्षेत्रात जोरदार हालचालींना वेग आला होता. या दूध संघाची वार्षिक उलाढाल 120 कोटी रुपयांहून अधिक आहे. या निवडणुकीसाठी प्रथमच तब्बल 100 जणांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत त्यापैकी ७४ अर्ज वैध ठरल्याने यावर्षी साऱ्या जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले होते.

संबंधित बातम्या

Aurangabad | पुतळ्यावरून पुन्हा एकदा ‘एमआयएम’-शिवसेनेत जुंपली; जलील अन् खैरेंमध्ये खडाजंगी!

Rohit Patil | रोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळणार ; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने दिले संकेत

Wardha Crime | आर्वीतील गर्भपात प्रकरण, कदमकडं सापडला कुबेराचा खजाना!; नऊ तासांत पोलिसांनी नेमकं काय शोधलं?

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.