AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद ‘घरकुल’चा मार्ग मोकळा, 20 हेक्टर जागा मिळाली, खासदार इम्तियाज जलील यांच्या पाठपुराव्याला यश!

अखेर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घरकुल प्रकल्पासाठी तीन ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. यासंबंधीचे पत्र 8 फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाकडून मनपाला प्राप्त झाले.

औरंगाबाद 'घरकुल'चा मार्ग मोकळा, 20 हेक्टर जागा मिळाली, खासदार इम्तियाज जलील यांच्या पाठपुराव्याला यश!
| Updated on: Feb 09, 2022 | 11:09 AM
Share

औरंगाबादः पंतप्रधान आवास योजना म्हणजेत घरकुल योजना (Gharkul Scheme) ही औरंगाबाद जिल्ह्यात अपयशी ठरल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. लोकसभेत त्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. तसेच एमआयएमच्या वतीने शहरात घरकुल ही फेककुल योजना आहे, असे आरोप करत मोठी बॅनरबाजी (MIM Banner) केली होती. औरंगाबाद भाजपनेदेखील राज्य शासनाच्या वतीने शहरात घरकुल योजनेसाठी जागा उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप केला होता. या सर्व आरोप-प्रत्यारोपानंतर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी तिसगाव, हर्सूल, पडेगावातील एकूण 20 हेक्टर जागा घरकुलासाठी दिली. तसेच डीपीआरची प्रक्रियादेखील वेगात राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षानंतर औरंगाबादमधील घरकुल साकारण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

कुठे अडकली होती योजना?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये शहरी भागातील बेघर, भूमीहीन नगारिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे, अभियानाची घोषणा केली होती. मार्च 2022 पर्यंत या अभियानाची मुदत आहे. याअंतर्गत महापालिका प्रशासन व तत्कालीन सत्तेत असलेल्या सेना-भाजप युतीच्या नगरसेवकांनी जागोजागी कँप लावून शहरातून स्वतःचे घर नसलेल्या नागरिकांकडून अर्ज भरून घेतले. त्यानुसार औरंगाबाद शहरातून 80,518 अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती यातील 51 हजार लाभार्थ्यांसाठी जागा निश्चित करून घरकुल प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जागेचा वाद आणि प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनचतेमुळे आजवर ही योजना कागदावरच राहिली. शहरातील फक्त 355 जणांना घरकुल बांधून देण्यात आले.

केंद्र सरकारच्या नोटीसीनंतर कार्यवाही

खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेच्या अधीवेशनात औरंगाबाद शहरातील घरकुल योजनेच्या अपयशाबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर केंद्र सरकारने राज्य शासनासह औरंगाबादेतील संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून विचारणा केली. तसेच लोकसभेच्या स्थायी समितीसमोर खुलासा सादर करण्यासाठी बोलावले. लोकसभेच्या स्थायी समितीसमोर उत्तर द्यावे लागणार असल्याने अखेर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घरकुल प्रकल्पासाठी तीन ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. यासंबंधीचे पत्र 8 फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाकडून मनपाला प्राप्त झाले.

इतर बातम्या-

VIDEO : लग्नातील वऱ्हाडींचा श्रीवल्ली ठेका, डान्स पाहून जेवणकऱ्यांच्या काळजाचा चुकला ठोका!

‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’वर राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती; नागपुरात रेल्वेने वेधले प्रवाशांचे लक्ष

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.