Aurangabad: घाटी रुग्णालयात औषध तुटवडा झाल्यास हाफकिनवर कारवाई, हायकोर्टाने काय दिले आदेश?

औरंगाबादचे घाटी रुग्णालय ही अग्रेसर वैद्यकीय संस्था असून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून येथे रुग्णांचा ओघ सुरु असतो. त्यामुळे येथील सुविधांच्या बाबतीत त्रुटी आढळणे गंभीर असल्याचे खासदार जलील यांनी न्यायालयासमोर मांडले.

Aurangabad: घाटी रुग्णालयात औषध तुटवडा झाल्यास हाफकिनवर कारवाई, हायकोर्टाने काय दिले आदेश?
औरंगाबाद घाटी रुग्णालय
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 10:08 AM

औरंगाबादः शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Aurangabad Government medical collage) आणि रुग्णालयात अर्थात घाटीमध्ये औषधींचा तुटवडा निर्माण झाल्यास हाफकीन महामंडळ आणि संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने राज्य शासनाला दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) नुकतेच हे आदेश दिले. तसेच घाटी रुग्णालयातील वर्ग 3 आणि 4 वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरतीची प्रक्रिया पुढील 6 ते 8 आठवड्यात राबवण्यात यावी, असेस आदेशही कोर्टाने शासनाला दिले आहेत. खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस.जी. डिगे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी 28 एप्रिल 2022 रोजी होईल.

काय आहे नेमकं प्रकरण?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद यांनी खासदार इम्तियाज जलील यांना 25 फेब्रुवारी 2022 पत्र लिहिले. त्यात मे. हाफकीन महामंडळाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णलयात होणारा औषधींचा पुरवठा अतिशय अनियमित आणि अनिश्चित विलंबाने होत असल्याचं सांगण्यात आलं. हे पत्र मा.उच्च न्यायालयात सादर करण्यात आले. खासदार जलील यांनी मा.उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले की, सदरील पत्रात नमुद करण्यात आलेल्या63 औषधींपैकी बहुतांश औषधी या अत्यंत मुलभूत व उपचारासाठी अत्यावश्यक आहेत. तरीही त्यांचा योग्य पुरवठा होत नाही. सबब बाब गंभीर स्वरुपाची असल्याने मा.उच्च न्यायालयाने सदरील पत्र न्यायालयाच्या रेकॉर्डवर घेतले. औषधींचा सुनिश्चित वेळेत पुरवठा व्हावा, अशी आशा आणि अपेक्षा राज्य शासनाकडून असल्याचे आपल्या आदेशामध्ये नमूद केले. तसेच औषधी पुरवठा संदर्भात अनियमितता व बेकायदेशिरपणा आढळल्यास संबंधीत संस्थेवर व व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी असेही आदेशात नमूद केले.

वर्ग 3 आणि 4 ची वैद्यकीय पदेही भरण्याचे आदेश

तसेच घाटी रुग्णालयातील वर्ग 3 आणि 4 ची वैद्यकीय पदांची भरतीही अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचे खासदारांनी दर्शवून दिले. खासदार जलील यांनी वैयक्तिक पद्धतीने या प्रकरणी युक्तीवाद मांडला. जनहित याचिका दाखल करुन आठ महिण्यापेक्षा जास्त कालावधी झालेला असतांना देखील वर्ग 3 व 4 ची वैद्यकीय पदे आजपर्यंत भरण्यात आली नाही. अगोदरच्या पदे भरती प्रक्रियेमध्ये बेकायदेशीर गोष्टी घडऔरंगाबादचे घाटी रुग्णालय ही अग्रेसर वैद्यकीय संस्था असून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून येथे रुग्णांचा ओघ सुरु असतो. त्यामुळे येथील सुविधांच्या बाबतीत त्रुटी आढळणे गंभीर असल्याचे खासदार जलील यांनी न्यायालयासमोर मांडले.ल्यामुळे सदरील प्रक्रिया रद्द करावी लागली होती अशी बाजू राज्यशासनामार्फत मांडण्यात आली. त्यावर उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, रिक्त पदांची संख्या प्रचंड आहे. वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांव्यतीरिक्त वैद्यकीय सेवा अपंग होईल म्हणून राज्य शासनाला सहा ते आठ आठवड्यात वर्ग 3 व 4 ची रिक्त पदे भरण्यासंदर्भात कार्यवाही सुरु करण्याचे आदेशात नमूद केले. शासनातर्फे अ‍ॅड. एस.जी कार्लेकर यांनी काम पाहिले.

इतर बातम्या-

युवक काँग्रेस निवडणूक, तौसिफ खान नागपूरचे शहराध्यक्ष, निवडणुकीत गैरप्रकार झालाय?

VIDEO | औरंगाबादेत करंजखेडा बाजार समितीत राडा, गुंड व्यापाऱ्यांची आरेरावी, शेतकऱ्याला जास्त भाव दिल्यानं मारहाण!

Non Stop LIVE Update
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.