Aurangabad | औरंगाबादच्या ऐतिहासिक घडाळ्याची टिक टिक सुरु, शहागंजमधील क्लॉक टॉवरची दुरुस्ती, 15 ऑगस्टला विद्युत रोषणाई

मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा मोहिमेत शहागंज क्लॉक टॉवर व अन्य दरवाजांची रोषणाई करण्यात येईल.

Aurangabad | औरंगाबादच्या ऐतिहासिक घडाळ्याची टिक टिक सुरु, शहागंजमधील क्लॉक टॉवरची दुरुस्ती, 15 ऑगस्टला विद्युत रोषणाई
औरंगाबादमधील ऐतिहासिक शहागंज टॉवरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 9:25 AM

औरंगाबाद:  नागरिक ज्या ऐतिहासिक (Aurangabad history) क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला आहे. शहागंज टॉवरवरील (Aurangabad Shahaganj Tower) घड्याळ औरंगाबाद स्मार्ट सिटीतर्फे (Smart city) सुरू करण्यात आले आहे. सोबतच घड्याळाची घंटासुद्धा सुरू करण्यात आली आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी ने केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत शहराचे ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि सुशोभिकरण करण्याचा प्रकल्प औरंगाबादचेहाती घेतला आहे. ह्या प्रकल्पांतर्गत शहराचे 9 दरवाजे, तटबंदीची भिंत आणि शाहगंज क्लॉक टॉवरची दुरुस्ती व सौंदर्यीकरण करण्यासाठी मागच्या 2 वर्षापासून औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे कामं सुरु आहेत. या उपक्रमाअंतर्गतच शहागंज येथील घड्याळ अखेर सुरु करण्यात आलं आहे.

ऐतिहासिक महत्त्व काय?

शाहगंज क्लॉक टॉवर 1901 ते 1906 ह्या कालावधीत निझाम सरकारचाद्वारे उभारण्यात आले होते. नंतर 1962 च्या युध्दाच्या वेळी त्याच्यावर चेतावनी म्हणून घंटा वाजवली जात होती. तसेच विविध महत्त्वाच्या प्रसंगांवर ही घंटा वाजवली जात होती. म्हणूनच जुन्या औरंगाबाद शहराची ओळखचं ते एक अभिन्न अंग होतं. तरी कालांतराने शाहगंज क्लॉक टॉवरची इमारत आणि घड्याळ जुने झाल्यामुळे बंद पडले होते. स्मार्ट सिटी तर्फे प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी ह्यांनी इंटॅकच्या सल्ल्याने पारंपरिक पद्धतीने शाहगंज क्लॉक टॉवरचे नूतनीकरण केले. परंतु घड्याळासाठी मेकॅनिक उपलब्ध होत नव्हते. म्हणून स्मार्ट सिटी कडून यासाठी शोध घेण्यात आला.

हैदराबादच्या कंपनीतर्फे दुरुस्ती

हैदराबाद येथे रमेश वॉच कॉर्पोरेशन एजन्सीने घड्याळ तयार करून इमारतीत बसवले. गुरुवारी ते घड्याळ सुरू करण्यात आले आणि घंटा वाजण्यास सुरुवात झाली. ही घंटा सकाळी पाच ते रात्री दहापर्यंत प्रत्येक तासाला वाजणार आहे. शाहगंज क्लॉक टॉवर ची दुरुस्ती साठी ₹29 लाख आणि घड्याळ व घंटा बसवण्यासाठी ₹3.6 लाख स्मार्ट सिटीच्या निधीतून वापरण्यात आले आहेत.

15 ऑगस्टनिमित्त रोषणाई

मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा मोहिमेत शहागंज क्लॉक टॉवर व अन्य दरवाजांची रोषणाई करण्यात येईल. प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी, प्रकल्प सहयोगी किरण आढे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे ह्यांचा मार्गदर्शनाखाली कार्य केले. ह्याचांनंतर

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.