VIDEO | कमालच झाली की… पावसाचं पाणी घरात येतं म्हणून घरच चार फूट हवेत उचललं, औरंगाबादचा प्रयोग पाहिलात का?

आनंद कुलकर्णी यांनी सांगितलं की, हाऊस लिफ्टिंगच्या या प्रयोगासाठी हरियाणातील एजन्सीला काम देण्यात आलं आहे. 5 मे रोजी हे काम हाती घेण्यात आलं. पुढील काही दिवसातच हा प्रयोग पूर्ण होईल.

VIDEO | कमालच झाली की... पावसाचं पाणी घरात येतं म्हणून घरच चार फूट हवेत उचललं, औरंगाबादचा प्रयोग पाहिलात का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 11:51 AM

औरंगाबादः पावसाचं पाणी (Rain water) घरात येतं म्हणून मोठ्या मेहनतीनं बांधलेलं आपलं घर तोडावं लागणं, ही मोठी कठीण गोष्ट असते. पण हे घर न पाडताच, घरात येणाऱ्या पाण्याची समस्या सोडवली तर? असा विचार करून औरंगाबादच्या आनंद कुलकर्णी यांनी अनोखा मार्ग स्वीकारायचं ठरवलं. दोन हजार चौरस फूट बांधकाम असलेलं घर जॅक (Jack) लावून चार फुटांनी हवेतच उचलून (House lifting) घ्यायचा निर्णय घेतला. विचार मनात आला, पण ही गोष्ट सत्यात उतरवणंही तितकंच जोखिमीचं काम होतं. पण काहीही करून आपल्या घराला अजिबात धक्का लागू द्यायचा नाही, या निश्चयाला ठाम असलेल्या आनंद कुलकर्णींनी याकरिता मेहनत घेतली. हरियाणातील एका एजन्सीच्या मदतीनं हे काम करायचं ठरलं. 5 मे रोजी या मोहिमेला सुरुवातही झाली आहे. आनंद कुलकर्णी यांचं सातारा परिसरातील घर जमिनीपासून बऱ्यापैकी वर उचलून घेण्यात आलं आहे. येत्या काही दिवसातच हे काम पूर्णत्वास जाणार आहे.

घर वर कसं उचललं ?

एखादी चारचाकी पंक्चर झाल्यावर तिला जॅक लावून ज्या प्रकारे गाडीचा समोरचा किंवा मागचा भाग उचलला जातो. त्याच प्रकारे घरही उचलतात. फक्त ज्या घराला वर उचलायचे आहे, त्या घराच्या भिंतीच्या बाजूने आधी दोन-दोन फूट खोदकाम करतात. बिम लागले की, मग खाली जॅक लावला जातो. त्यानंतर गाडी जशी वर उचलतात तसे हळू हळू या जॅकने घर वर उचलले जाते. पिलरच्या तसेच लोडबेअरिंगच्या घरांवरही हा प्रयोग करता येतो.

हे सुद्धा वाचा

house lifting, Aurangabad

मराठवाड्यात पहिलाच प्रयोग

जॅक लावून घर उचलण्याचे प्रयोग विदेशात नेहमीच होत असतात. महाराष्ट्रात पुण्यातही हा प्रयोग झालाय. मात्र मराठवाड्यात प्रथमच अशा पद्धतीने घर उचलण्यात येत आहे. सातारा परिसरातील सत्कर्मनगरातील आनंद कुलकर्णी यांनी हा प्रयोग केला आहे. कुलकर्णी यांनी 2011 मध्ये दोन हजार चौरस फुटांचं घर बांधलं होतं. कालांतरानं बाजूच्या गल्लीतून जाणार रस्ता उंच झाला आणि त्यामुळे पावसाचं पाणी दरवर्षीच घरासमोर तुबूंन बसत होतं. त्यामुळे अखेर नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांनी हे घर वर उचलून घेण्याचा निर्णय घेतला.

घर उचलण्यासाठी खर्च किती?

आनंद कुलकर्णी यांनी सांगितलं की, हाऊस लिफ्टिंगच्या या प्रयोगासाठी हरियाणातील एजन्सीला काम देण्यात आलं आहे. 5 मे रोजी हे काम हाती घेण्यात आलं. पुढील काही दिवसातच हा प्रयोग पूर्ण होईल. – नवं घर बांधायचं म्हटलं तर दीड हजार प्रति चौरस फूट असा खर्च येतो. पण घर वर उचलून घेण्यासाठी सरासरी 230 रुपये प्रति चौरस फूट असा खर्च येतो. – अशा रितीने हे संपूर्ण घर उचलून घेण्यासाठी चार ते साडे चार लाख रुपये खर्च येत आहे. – 40 दिवसात हा प्रयोग पूर्णत्वास येतो. – घर उचलण्यासाठी 250 जॅक लावण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.