औरंगाबादेत आता महाराणा प्रताप पुतळ्याचा वाद, विरोध करणाऱ्या खा.जलील यांना दानवेंचा इशारा, राजपूत समाजाची निदर्शनं

औरंगाबादेत आता महाराणा प्रताप पुतळ्याचा वाद, विरोध करणाऱ्या खा.जलील यांना दानवेंचा इशारा, राजपूत समाजाची निदर्शनं
पुतळ्याला विरोध करणाऱ्या इम्तियाज जलील यांचा राजपूत समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला

शहरात एकिकडे मोठा गाजावाज होत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची स्वारी औरंगाबादेत धडकली आहे तर दुसरीकडे आणखी एका पुतळ्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून हा वाद पेटलाय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 24, 2022 | 1:43 PM

औरंगाबादः शहरात एकिकडे मोठा थाटामाटात शिवरायांच्या पुतळ्याची (Aurangabad Shivaji Statue) स्वारी औरंगाबादेत धडकली आहे तर दुसरीकडे आणखी एका पुतळ्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून हा वाद पेटलाय. एक कोटी रुपये निधीतून हा पुतळा उभारणीचे काम करण्याचा प्रस्ताव आहे. हे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी शिवसेना, भाजपने आग्रह धरला आहे, मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पुतळ्याला विरोध केला आहे.

दरम्यान, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांचा निषेध राजपुत समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणाऱ्या इम्तियाज जलील यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करू नये, असा इशारा राजपूत समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

एमआयएमची मागणी काय?

गेल्या महिन्यात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार अंबादास दानवे यांनी सिडको कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप पुतळा उभारण्याचा कामाला सुरुवात करण्याची मागणी केली. त्या बैठकीतच खासदार इम्तियाज जलील यांनी त्यास विरोध केला होता. याच निधीतून ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिकी शाळा सुरु करण्याची मागणी केली होती. खासदार जलील यांनी नुकतेच या आशयाचे लेखी पत्र पालकमंत्री सुभाष देसाई आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. महान शूरवीर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारून काही साध्य होणार नाही, महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर व सन्मान सैनिका शाळा हाच असेल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

पुतळा होणारच, विरोध मोडून काढणार- दानवे

महाराणा प्रताप, शिवाजी महाराज हे या देशाचा स्वाभिमान आहेत. त्यांच्यापासून देशाला नेहमीच प्रेरणा मिळत राहील. एक वेळ सूर्य, चंद्र तारे झुकू शकतात, पण महाराणा प्रताप देशविघातक शक्तीसमोर, रझाकारी वृत्तीसमोर झुकू शकत नाहीत. या महाराणा प्रतापांचा इतिहास ज्यांना माहिती नाही, त्यांनी विरोध करू नये. त्यांनी आधी स्वतःचा इतिहास पहावा. महाराणा प्रताप यांचा पुतळा होण्यासाठी कोणतीही शक्ती विरोध करत असेल तर तो विरोध आम्ही सहज मोडून काढू, असा इशारा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिला आहे.

दिल्लीत जाऊन एखादी शाळा आणा- दानवे

दरम्यान, अंबादास दानवे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना आणखी एक सल्ला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. ते म्हणतात, केंद्र सरकारने यंदा अर्थसंकल्पात देशातील 100 शाळा संलग्नित करून त्यांना सैनिकी शाळेचा दर्जा द्यायचे ठरवले आहे. यातील एखादी शाळा दिल्लीत जाऊन जिल्ह्यासाठी आणा. शहर वाढतंय. शहरातील केंद्रीय विद्यालयाच्या विस्तारासाठी दिल्लीत थोडे श्रम खर्ची पाडता आले तर पहा.. असा सल्ला अंबादास दानवे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिला.

इतर बातम्या-

Bear Viral Video : गावात घुसले दोन अस्वल, गावकऱ्यांची पळापळ; मशाल घेऊन पिटाळून लावलं

कोव्हिड 19  मधून रिकव्हर झालायेत?, आधी तुमचा ब्रश बदला; पुन्हा कोरोना संक्रमणापासून दूर रहा 


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें