AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद | वाळूज ते शेंद्रा MIDC  मार्ग,  मेट्रो रेल्वेच्या DPR साठी महामेट्रोचे पथक शहरात दाखल

वाळूज ते शेंद्रा या मार्गावर मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्यासाठी महामेट्रोच्या चार अधिकाऱ्यांचे पथक सर्वेक्षणासाठी बुधवारी शहरात दाखल झाले. हे पथक रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, हर्सूल, सिडको बसस्थानक भागात फिरले

औरंगाबाद | वाळूज ते शेंद्रा MIDC  मार्ग,  मेट्रो रेल्वेच्या DPR साठी महामेट्रोचे पथक शहरात दाखल
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
| Updated on: Feb 10, 2022 | 10:08 AM
Share

औरंगाबादः मुंबई, पुणे शहरांप्रमाणे औरंगाबाद शहरातही मेट्रो (Metro in Aurangabad) रेल्वे सुरु करण्याची योजना शहरात काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी यासाठी पुढाकर घेतला असून हा विषय चांगलाच उचलून धरला आहे. त्यामुळे शहरातील शेंद्रा ते वाळूज या दोन MIDC च्या मार्गावर (Waluj to Shendra)  मेट्रो रेल्वे सुरु करण्याच्या हालचाली वेगाने सुरु आहेत. या तीस किलोमीटर मार्गावर मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव असून त्याचा DPR बनवण्यासाठी बुधवारी महामेट्रोचे पथक शहरात दाखल झाले आहे. या पथकातील चार अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी प्रकल्पासंदर्भात प्राथमिक चर्चा केली.

पथकाने कुठे कुठे भेट दिली?

शहरातील वाळूज ते शेंद्रा या मार्गावर मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्यासाठी महामेट्रोच्या चार अधिकाऱ्यांचे पथक सर्वेक्षणासाठी बुधवारी शहरात दाखल झाले. हे पथक रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, हर्सूल, सिडको बसस्थानक भागात फिरले. दुपानी महापालिका कार्यालयात जाऊन अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, उपसंचालक नगररचना ए.बी. देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर स्मार्ट सिटीच्या कार्यालयात त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. गुरुवारी शहराच्या विविध भागासह वाळूज आणि शेंद्रा MIDC ला हे अधिकारी भेट देत आहेत.

पालकमंत्र्यांचा प्रस्ताव, कराड यांचा पाठपुरावा

मुंबई, पुणे शरांप्रमाणेच औरंगाबादमध्येही मेट्रो रेल्वेची गरज असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच नमूद केले होते. नंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही मेट्रोचा विषय उचलून धरला. स्मार्ट सिटी, महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर स्मार्ट सिटीने वाळूज ते शेंद्रा या दोन MIDC दरम्यान मेट्रो सेवा सुरु करण्याचा डीपीआर बनवण्याचे काम महामेट्रोकडे सोपवले आहे.

इतर बातम्या-

एकता कपूरची नवी ‘नागिन’ महक चहल, बिग बॉस विजेत्या तेजस्वी प्रकाशला देणार टक्कर

सावध व्हा… लहान मुलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढतो आहे. लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...