मोठी बातमी| देशाच्या अर्थसंकल्पावर यंदा औरंगाबादची मोहोर, अर्थमंत्र्यांबरोबर डॉ. भागवत कराड सादर करणार बजेट!

मोठी बातमी| देशाच्या अर्थसंकल्पावर यंदा औरंगाबादची मोहोर, अर्थमंत्र्यांबरोबर डॉ. भागवत कराड सादर करणार बजेट!
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, अर्थमंत्री निर्मला सीतारमण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारण यांच्यासोबत अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मला मिळणार आहे. माझ्यासाठी ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. देशाची आर्थिक स्थिती खूप सक्षम झाली आहे, अशी प्रतिक्रिया अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.

दत्ता कानवटे

| Edited By: सागर जोशी

Jan 25, 2022 | 9:15 PM

औरंगाबादकर आणि संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी बातमी आहे. मराठवाड्याचे सुपुत्र आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) हे अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Seetharaman) यांच्यासोबत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जनतेसमोर सादर करतील. अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे त्यांच्यासोबत बजेटमधील काही भाग सादर करतील. अर्थसंकल्प सादर करायला मिळतोय, हे माझं भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. भागवत कराड यांनी tv9 च्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

काय म्हणाले डॉ. भागवत कराड?

टीव्ही9 च्या प्रतिनिधींशी बोलताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, येत्या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारण यांच्यासोबत अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मला मिळणार आहे. माझ्यासाठी ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. देशाची आर्थिक स्थिती खूप सक्षम झाली आहे. जीएसटीचं मासिक उत्पन्न 1 लाख कोटी अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्ष 1 लाख 31 हजार कोटी मासिक उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे.’

राज्यातील इतर मंत्र्यांवर आरोप

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यावेळी बोलताना राज्यातील इतर मंत्र्यांवर गंभीर आरोप केले. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या बैठकीला राज्यातील अर्थ मंत्र्यांनी दांडी मारली. पत्र पाठवून आणि सूचना करूनही अर्थमंत्री बैठकीला गैरहजर राहिल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे राज्याची नेमकी आर्थिक स्थिती समोर येऊ शकली नाही, असा आरोपही डॉ. भागवत कराड यांनी केला आहे.

1 फेब्रुवारीला सादर होणार देशाचं बजेट!

देशातील नवी कर प्रणाली, महागाई, इतर सवलती आणि योजनांची माहिती देणारा अर्थसंकल्प यंदा 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यादर करतील. 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा हा केंद्रीय अर्थसंकल्प असेल. कोरोना साथीचा देशातील उद्योगांवर मोठा परिणाम झाल्यानं यंदाचा अर्थसंकल्प काय असेल, देशाची सद्यस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता सामान्य नागरिकांना आहे.

इतर बातम्या-

PM Narendra Modi | पंतप्रधानांची थोड्याच वेळात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; सरकारी योजनांची घेणार झाडाझडती!

Video | भाटीया रुग्णालयाजवळील 20 मजली इमारतीत भीषण आग, 7 जण जखमी

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें