औरंगाबादः शहरवासियांसाठी आणि एकूणच शहरात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांसाठी महत्त्वाची बातमी आहे. औरंगाबाद महापालिकेचे (Aurangabad municipal corporation) 250 रुपयांचे कर्ज सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मंजूर केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी (Smart city) प्रकल्पांसाठी महापालिका जो वाटा भरणार होती, त्यासाठीचा निधी महापालिकेकडे येईल. महापालिकेचा स्मार्ट सिटीसाठीचा 182 कोटी रुपयांचा वाटा शिल्लक होता. आता लवकरच तो भरला जाईल. तसेच स्मार्ट सिटीतून प्रस्तावित उर्वरीत कामे आता मार्गी लागतील, असे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी सांगितले. महापालिका आता कर्ज मिळाल्यानंतर स्मार्ट सिटीचे 182 कोटी रुपये भरणार आहे. कर्ज मंजूर झाल्याने आता स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे मार्गी लागतील, असा विश्वास प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे.