Aurangabad | महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लाखो लीटर पाणी रोज वाया, पुनर्वापरासाठी पुढाकार घेणार

अनेक नागरिक नळाच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, बागकाम, गाड्या धुण्यासाठी व इतर कारणासाठी करतात. त्यांना एसटीपीचे प्रक्रियायुक्त पाणी मिळाले तर नळाच्या पाण्याची बचत होईल. त्यामुळे कांचनवाडी येथील प्रकल्पातून पाइपलाइन करून हे पाणी शहरातील काही पॉइंटवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

Aurangabad | महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लाखो लीटर पाणी रोज वाया, पुनर्वापरासाठी पुढाकार घेणार
सांकेतिक छायाचित्रImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 3:01 PM

औरंगाबादः औरंगाबाद महापालिकेने (Aurangabad municipal corporation) कोट्यवधी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट अर्थात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे केले. या अंतर्गत कांचनवाडी, पडेगाव, झाल्टा फाटा येथे एसटीपी प्लांट सुरु केले. या तिन्ही प्रकल्पांमध्ये (waste water treatment plant) जवळपास 70 एमएलडी पाणी वापरायोग्य होते. एक MLD म्हणजे 10 लाख लीटर पाणी.  मात्र प्रक्रिया केल्यानंतरही या पाण्याचा योग्य वापर होत नाही. यामुळे हे पाणी नदीपात्रात सोडले जाते. आता हे पाणी वापरायोग्य क्षेत्राकडे वळवण्यासाठी मनपा प्रयत्न करणार आहे. या पाण्याचा वापर सफारी पार्क आणि इतर कामांसाठी व्हावा, यासाठी महापालिका पुढाकार घेणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी दिली आहे.

शहरात तीन ठिकाणी एसटीपी प्रकल्प

मनपाने कांचनवाडी येथे 161 एमएलडी, पडेगाव येथे 10 एमएलडी तर झाल्टा फाटा इथं 35 एमएलडी क्षमतेचे एसटीपी प्लांट सुरु केले आहेत. या तिन्ही प्रकल्पांमध्ये अनुक्रमे 60 ते 70 एमएलडी , 2 एमएलडी आणि 6 ते 7 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. हे प्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसी, डीएमआयसी, बांधकाम व्यवसायिक, वीटभट्टी चालकांनी वापरावे, यासाठी मनपाने प्रयत्न केले. मात्र समृद्धी महामार्ग वगळता इतरांनी प्रतिसाद दिला नाही. आता महापालिकेने या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका कशा प्रकारे वापर करणार?

– महापालिका पडेगावच्या प्लांटजवळ असलेल्या सफारी पार्कला हे पाणी देणार आहे. – तर कांचनवाडी येथील एसटीपी प्रकल्पातील 50 ते 60 एमएलडी पाणी दररोज वाया जाते. अनेक नागरिक नळाच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, बागकाम, गाड्या धुण्यासाठी व इतर कारणासाठी करतात. त्यांना एसटीपीचे प्रक्रियायुक्त पाणी मिळाले तर नळाच्या पाण्याची बचत होईल. त्यामुळे कांचनवाडी येथील प्रकल्पातून पाइपलाइन करून हे पाणी शहरातील काही पॉइंटवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. – एसटीपीचे पाणी शहरात वापरले जावे, यासाठी नियोजन करण्याची जबाबदारी नगररचना विभागाचे उपसंचालक ए.बी. देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.

इतर बातम्या-

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवली, पण पसंती सत्यजीत कदमांना

Holi Hain! मासे, चिकन, मटण खरेदीसाठी खवय्यांची तुफान गर्दी, खवय्यांचा मांसाहारावर ताव

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.