AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत राडा! माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि पत्नी संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की!

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्टीकरण दिले असून सभेत मी कुणाचेही नाव घेतले नाही. त्यांनी उगाच सर्व प्रकार अंगावर ओढून घेतला तर मी तरी काय करणार, असा सवाल माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

औरंगाबादेत राडा! माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि पत्नी संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की!
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 11:19 AM
Share

औरंगाबादः कन्नड तालुक्यातील औराळा इथं काल माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजना जाधव (Sanjana Jadhav) यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.  दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते काल गुरुवारी आमने सामने आले. त्यानंतर काही वेळासाठी औराळ्यातील (Kannad) वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले होते. येथील आठवडी बाजारात देखील या धक्काबुक्कीचे पडसाद दिसून आले. औराळा इथं हर्षवर्धन जाधव यांची सभा सुरु होती. सभा संपताच  हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. नंतर या वादाला धक्काबुक्कीचे स्वरुप आले. गावातील काही तरुणांच्या मध्यस्थीने अखेर काही काळाने हे वातावरण शांत झाले.

काय आहे नेमकं कारण?

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावासाहेब दानवे यांच्या त्या कन्या आहेत.  मागील वर्षीच हर्षवर्धन जाधव यांनी संजना जाधव यांना आता माझे नाव लावू नका, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर संजना जाधव यादेखील राजकारणात सक्रीय झाल्या असून कन्नड-सोयगाव मतदारसंघात त्या अॅक्टिव्ह आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कन्नड तालुक्यातील विविध गावांमध्ये फिरत आहेत. सभा घेत आहेत. यासाठीच गुरुवारी औराळा इथं हर्षवर्धन जाधव यांची दुपारी बारा वाजेच्या सुमारास सभा सुरु होती. या सभेत हर्षवर्धन जाधव यांनी कुणाचेही नाव न घेता सर्व पक्षीय नेत्यांसह संजना समर्थकांवर टीका केली. दरम्यान, संजना जाधव यांचे समर्थक तथा शेरोडीचे सरपंच जयेश बोरसे, आडगावचे सरपंच ज्ञानेश्वर बोरसे, आडगावचे सरपंच ज्ञानेश्वर निकम हे सभेदरम्यान स्टेजवर जाऊन बसले. सभा संपताच त्यांनी हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. नंतर या वादाला धक्काबुक्कीचे स्वरुप आले. गावातील काही तरुणांच्या मध्यस्थीने अखेर काही काळाने हे वातावरण शांत झाले.

हर्षवर्धन जाधव काय म्हणाले?

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्टीकरण दिले असून सभेत मी कुणाचेही नाव घेतले नाही. त्यांनी उगाच सर्व प्रकार अंगावर ओढून घेतला तर मी तरी काय करणार, असा सवाल माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

संजना जाधव काय म्हणाल्या?

सदर राड्यावर संजना जाधव यांची प्रतिक्रिया विचारली असता, या कार्यक्रम आणि औराळ्यात झालेल्या बाचाबाचीविषयी मला काहीही माहिती नव्हते. हा सगळा प्रकार घडल्यानंतर माझ्या कानावर आला, त्यामुळे याविषयी काहीही प्रतिक्रिया देऊ शकणार नाही, असे वक्तव्य संजना जाधव यांनी केले.

इतर बातम्या-

eSHRAM | बेरोजगारी वाढल्याचा पुरावा हवाय? ई-श्रम पोर्टलवर 2 कोटी पदवीधरांची नोंदणी

Bandatatya Karadkar | महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य, राज्यभरात गोंधळ ते माफी; वाचा बंडातात्या कराडकर चर्चेत का आले ?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.