AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

eSHRAM | बेरोजगारी वाढल्याचा पुरावा हवाय? ई-श्रम पोर्टलवर 2 कोटी पदवीधरांची नोंदणी

ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांसाठी नोंदणी केली जाते. आतापर्यंत 24.54 कोटी कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 2 कोटी कामगार पदवीधर आहेत. तरुणांनी मोठ्या प्रमाणावर बिगारी काम करणा-यांनी या पोर्टलचा आधार घेतला आहे. त्यांचे मासिक उत्पन्न 10 हजार रुपयांपेक्षा ही कमी असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.

eSHRAM | बेरोजगारी वाढल्याचा पुरावा हवाय? ई-श्रम पोर्टलवर 2 कोटी पदवीधरांची नोंदणी
ई-श्रम पोर्टल
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 10:41 AM
Share

मुंबई : देशात बेरोजगारी वाढल्याचे अनेक जण ओरडून सांगत आहेत. काही संघटनांनी सर्वेक्षण करुन त्यांची आकडेवारी मांडली आहे. पण नकळत का होईना सरकारनेच देशातील बेरोजगारीच्या (unemployment) आकडे समोर आणले आहे. असंघटित क्षेत्रातील (unorganized Sector) कामगारांसाठी सरकारने ई-श्रम पोर्टल (eSHRAM portal) सुरु केले आहे. अवघ्या पाच महिन्यांत या पोर्टलवर कामगारांच्या उड्या पडल्या. कामगार म्हटला की, सर्वसाधारणतः अशिक्षित, कमी शिकलेला असा समाजाचा समज या आकडेवारीने सपशेल खोटा ठरवला आहे. देशातील तरुणाई बेरोजगारीच्या खाईत लोटल्या गेल्याचे नकळत या आकडेवारीवरुन उघड झाले आहे. ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांसाठी नोंदणी केली जाते. आतापर्यंत 24.54 कोटी कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 2 कोटी कामगार पदवीधर आहेत. तरुणांनी मोठ्या प्रमाणावर बिगारी काम करणा-यांनी या पोर्टलचा आधार घेतला आहे. त्यांचे मासिक उत्पन्न 10 हजार रुपयांपेक्षा ही कमी असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.

आकडे सांगायले गेले, नि सरकार फसले

गेल्या वर्षी असंघटित कामगारांची माहिती जमा करण्यासाठी आणि त्यांना विविध योजनेतंर्गत फायदे मिळवून देण्यासाठी सरकारने ई-श्रम पोर्टल तयार केले. बुधवारी (दि.2) राज्यसभेचे सदस्य रामनाथ ठाकूर यांनी ई-श्रम पोर्टलवर किती कामगारांनी नोंदणी केली असा सवाल उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी माहिती दिली. त्यानुसार, ई-श्रम योजनेची सुरुवात 26 ऑगस्ट 2021 रोजी झाली. 20 जानेवारी 2022 पर्यंत या पोर्टलवर 24.54 कोटी कामगारांनी नोंदणी केली. त्यातील 2 कोटी 88 हजार 63 तरुण पदवीधर आहेत. याचा अर्थ सरळ आहे, अशिक्षित आणि बिगारी काम करणा-या कामगारांमध्ये 2 कोटी तरुणांनी त्यांचे नाव नोंदवले आहे. परंतू या नोंदणी केलेल्या या कामगारांपैकी किती जणांना रोजगार मिळाला याचे उत्तर देणे राज्यमंत्र्यांनी खुबीने टाळले.

95 टक्के कामगारांचे उत्पन्न 10 हजारांहून कमी

ई-श्रम पोर्टलवरील माहितीनुसार, रजिस्ट्रेशन केलेल्या 24.54 कोटी कामगारांपैकी 23.43 कोटी म्हणजे 95 टक्के नोंदणी करणा-यांचे मासिक उत्पन्न 10 हजार रुपयांपेक्षा ही कमी आहे. तर 1.1 कोटी कामगारांचे मासिक उत्पन्न 10 ते 15 रुपये आहे.

कोण करु शकते नोंदणी

केंद्र सरकारने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात 2021 मध्ये ई-श्रम पोर्टल सुरु केले होते. या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कामगारांच्या उड्या पडल्या. बांधकाम मजूर, रोजंदारी, बिगारी, प्रवाशी श्रमिक, हातगाडी चालक, घरगुती कामगार, शेत मजूर यासह इतर क्षेत्रात रोजंदारीवर काम करणा-या तसेच ईएसआयसी वा ईपीएफओ चे सदस्य नसलेल्या कामगारांना, मजुरांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करता येते.

संबंधित बातम्या :

ही सवय बनवेल तुम्हाला लखपतीच नाही तर करोडपती, दरमहिन्याला एक हजारांची बचतीतून व्हा करोडपती! 

खुशखबर!, 100 पेटीएम भाग्यवंतांना एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार मोफत

भारतातील बेरोजगारीचे वास्तव समजून घ्या एका क्लिकवर

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.