AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena MLA | औरंगाबाद शिवसेनेचे सहाही आमदार नॉट रिचेबल, एकनाथ शिंदेंच्या बंडात शामील? मनपा निवडणुकांच्या तोंडावर नवं संकट!

शिवसेनाचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबादमधील 6 शिवसेना आमदार फुटले तर महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

Shiv Sena MLA | औरंगाबाद शिवसेनेचे सहाही आमदार नॉट रिचेबल, एकनाथ शिंदेंच्या बंडात शामील? मनपा निवडणुकांच्या तोंडावर नवं संकट!
| Edited By: | Updated on: Jun 21, 2022 | 10:37 AM
Share

औरंगाबादः महाविकास आघाडी सरकारला हादरवून टाकणाऱ्या घटना सध्या महाराष्ट्रात घडत असून शिवसेना आमदारांच्या या बंडात औरंगाबादचे आमदारही शामिल आहेत की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. औरंगाबाद हा मुंबई पालिकेनंतर शिवसेनेचा दुसऱ्या क्रमांकाच भक्कम गड मानला जातो. मात्र औरंगाबादमधील शिवसेनेचे सहा (ShivSena MLA) आमदारही काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेचे आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे 11 आमदारांना घेऊन सूरतमधील हॉटेलमध्ये रात्रीपासूनच मुक्कामी आहेत, अशी माहिती उघड झाली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरोधात बंड पुकारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सूरतमध्ये खलबतं सुरु आहेत, अशीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यात औरंगाबादमधील 9 आमदारांपैकी 6 आमदार नॉट रिचेबल असल्याने शहरातील मनपामधील शिवसेनेच्या सत्तेलाही खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

औरंगाबादचे कोण-कोण आमदार नॉट रिचेबल?

उदयसिंह राजपूत- कन्नड विधानसभा आमदार संजय शिरसाठ- औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघ रमेश बोरणारे- वैजापूर विधानसभा मतदार संघ प्रदीप जैस्वाल- औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघ अब्दुल सत्तार- सिल्लोड विधानसभा मतदार संघ संदीपान भुमरे- पैठण विधानसभा मतदार संघ

औरंगाबादचे 6 शिवसेना आमदार फुटले तर..?

शिवसेनाचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबादमधील 6 शिवसेना आमदार फुटले तर महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा हादरा बसेल. यासोबतच औरंगाबादमधील शिवसेनेची सत्ता गमावण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही महिन्यात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याची जोरदार तयारीही शहरात सुरु आहे. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडात हे आमदार शामिल झाले तर महापालिकेतील सत्ता शिवसेनेच्या हातून गमावण्याची भीती आहे.

राज्यातील अनेक आमदार फुटण्याची भीती

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तर राज्यात होऊ घातलेल्या विविध महापालिकांतील निवडणुकांवर याचा गंभीर परिणाम होतील. आगामी काळात ठाणे, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद, नाशिक महापालिकांच्या निवडणुका आहेत. शिंदेंच्या या बंडामुळे महापालिकेवर परिणाम होऊ शकतो. तसेच अंबरनाथ नगरपरिषद, कुळगाव बदलापूर नगरपरिषदही शिवसेनेच्या हातून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाराज एकनाथ शिंदेंच्या यांच्याशी निगडीत ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.