Akbaruddin Owaisi : नेशन बनता है हिंदूसे, नेशन बनता है.. अकबरुद्दीन ओवैसींची औरंगाबादेत देशी शाळा

तेलंगणा येथील सालार ए मिल्लत एज्युकेशन ट्रस्टच्या (Education trust) वतीने गरीबांच्या मुलांसाठी औरंगाबादमध्ये शाळा उघडण्यात येणार आहे. या शाळेच्या भूमीपूजन कार्यक्रमाला आज अकबरुद्दीन ओवैसी यांनी उपस्थिती लावली. यावेळच्या भाषणात ते बोलत होते.

Akbaruddin Owaisi : नेशन बनता है हिंदूसे, नेशन बनता है.. अकबरुद्दीन ओवैसींची औरंगाबादेत देशी शाळा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 6:40 PM

औरंगाबादः एरवी आक्रमक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगाबादेतल्या (Aurangabad) भाषणाच्या सुरुवातीलाच सर्वधर्मसमभावाची भाषा केली. देश फक्त एकाच धर्माच्या लोकांनी तयार होत नाही तर त्यात सर्व धर्माचे लोक असतात. सर्वांची प्रगती झाली तरच भारत सुपर पॉवर म्हणून जगात उभा राहील, असं वक्तव्य अकबरुद्दीन ओवैसी यांनी केलं. नेशन बनता है हिंदूसे, नेशन बनता है मुसलमानोंसे, सिखोसे, पारसीओंचे.. असं वक्तव्य आज अकबरुद्दीन औवैसी यांनी केलं. तेलंगणा येथील सालार ए मिल्लत एज्युकेशन ट्रस्टच्या (Education trust) वतीने गरीबांच्या मुलांसाठी औरंगाबादमध्ये शाळा उघडण्यात येणार आहे. या शाळेच्या भूमीपूजन कार्यक्रमाला आज अकबरुद्दीन ओवैसी यांनी उपस्थिती लावली. यावेळच्या भाषणात ते बोलत होते.

काय म्हणाले अकबरुद्दीन ओवैसी?

औरंगाबादमधील शाळेच्या भूमीपूजन सोहळ्यात भाषण करताना अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले, नेशन बिल्डिंग किंवा नेशन काँट्रिब्युशनची संकल्पना येते तेव्हा केवळ एकाच धर्माचा विचार करून चालत नाही. देश या संकल्पनेत, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारशी, जैन, बुद्ध आदी सर्व धर्मचे लोक येतात. अल्लाह न मानणाऱ्या लोकांचाही यात समावेश होतो. पण कोणत्याही एका धर्माची प्रगती झाल्यास देशाची प्रगती होत नाही. या देशाची प्रगती तेव्हाच होते, जेव्हा येथील प्रत्येक नागरिकाला आपण देशाच्या प्रगतीचा वाटेकरी आहोत, अशी जाणीव होईल… मुस्लीम मुलांना नेशन बिल्डिंग प्रक्रियेचा भाग बनवण्यासाठीच मी इथे आलो आहे, असं वक्तव्य अकबरुद्दीन ओवैसीं यांनी केलं.

औवैसींच्या दौऱ्यात औरंगजेबाच्या कबरीचा वाद

अकबरुद्दीन ओवैसी यांच्या दौऱ्यानंतर औरंगाबादमध्ये नवा वाद उफालून आला आहे. खासदार इम्तियाज जलील आणि अकबरुद्दीन ओवैसी यांनी आज शहरातील धार्मिक स्थळांना, दर्ग्याला भेटी दिल्या. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरही फुलं वाहिली. यावरून शिवसेना, भाजपसहित सामान्य जनतेतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आरधी औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे आम्ही कधीही टेकले नाही म्हणणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांनी असे कृत्य केल्याने शिवसेनेनं आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. जनतेनं चुकीचा खासदार निवडून दिल्याचं वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. तसंच कोणतेही मुस्लिम बांधव औरंगजेबाला पूजत नाहीत किंवा आपल्या मुलाचं नाव तरी औरंगजेब ठेवत नाहीत, मग यांनाच औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून काय मिळवायचंय, शहरातलं वातावरण गढूळ करायचंय, असा आरोप खैरे यांनी केलाय.

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.