Aurangabad | समृद्धी महामार्गाची मंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी, हेलिकॉप्टरही उतरवलं, पहा VIDEO

बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी नागपूर मुंबई (Nagpur Mumbai) समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Highway) पहिला टप्पा येत्या 2 मे रोजी खुला होणार आहे. यानिमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज महामार्गाची पाहणी केली.

Aurangabad | समृद्धी महामार्गाची मंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी, हेलिकॉप्टरही उतरवलं, पहा VIDEO
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावर उतरलं Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 11:28 AM

औरंगाबाद | बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी नागपूर मुंबई (Nagpur Mumbai) समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Highway) पहिला टप्पा येत्या 2 मे रोजी खुला होणार आहे. यानिमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज महामार्गाची पाहणी केली. एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी या महामार्गाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या समृद्धी महामार्गावर हेलीपॅडची व्यवस्था करण्यात आली. एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावर उतरवण्यात आलं. त्यांनी महामार्गावर उतरून पाहणी केली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोडणारा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा आकृतीबंध असलेल्या या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते सेलूबाजार आणि जालना ते शिर्डी यादरम्यानचा रस्ता पूर्णपणे तयार आहे.

वैजापूर-गंगापूर तालुक्यादरम्यान हेलीपॅड

वैजापूर-गंगापूर तालुक्यादरम्यान मंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावर पहिल्यांदाच उतरवण्यात आलं. मुंबईतून औरंगाबादकडे येताना एकनाथ शिंदे यांनी आपला हवाई मार्ग समृद्धी महामार्गाला समांतर असा ठेवला होता. या मार्गाने त्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. वैजापूर-गंगापूर दरम्यानच्या इंटरचेंजवरही शिंदे यांनी ही पाहणी केली. दोन ते तीन वेळा त्यांनी हेलिकॉप्टर महामार्गावरून फिरवले. आंतरराष्ट्रीय दर्जाचा असा हा महामार्ग असून यावर हेलिकॉप्टर आणि विमानदेखील उतरवले जाण्याची शक्यता आहे. आज प्रथमच इथे हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं.

स्थानिक प्रशासन व नेत्यांकडून स्वागत

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गावर हेलिकॉप्टर उतरवल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हेदेखील तेथे उपस्थित होते. शिवसेना आमदार रमेश बोरनारे, आमदार संजय शिरसाट हे देखील येथे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन – एकनाथ शिंदे

समृद्धी महामार्गावरील पहिल्या टप्प्याचे म्हणजेच नागपूर ते सेलूबाजार हा 210 किमीचे अंतर लोकांसाठी लवकरच खुले होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. तसेच पुढील महिन्यात जालना ते शिर्डी हा टप्पादेखील सुरु होईल. हा जागतिक दर्जाचा महामार्ग असून देशातला सर्वात मोठा महामार्ग आहे. या मार्गाद्वारे महाराष्ट्राच्या प्रगतीची द्वारं खुली होतील, असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.

इतर बातम्या-

वरळीतील अलिशान अपार्टमेंटची 144 कोटींना विक्री; आयनॉक्स समूहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी केली खरेदी

Health Benefits Of Flax Seeds : सुपर फूड अळशी, रोज 1 चमचा अळशी खाल्ल्याने होतील चमत्कारिक फायदे

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.