Aurangabad: अवैध नळ जोडणी धारकांनो सावधान, नव्या योजनेत परवानगी असेल तरच पाणी मिळणार!

पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरातील 700 किलोमीटरचे जुने पाईप काढून त्याठिकाणी नवे पाईप टाकले जाणार आहेत. हे काम झाल्यानंतर नागरिकांना नव्याने कनेक्शन देताना त्यासाठी महानगरपालिकेची परवानगी आहे का, हे पाहिले जाणार आहे.

Aurangabad: अवैध नळ जोडणी धारकांनो सावधान, नव्या योजनेत परवानगी असेल तरच पाणी मिळणार!
प्रातिनिधिक छायाचित्र


औरंगाबादः शहरात सध्या 1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा (Water scheme) योजनेचे काम सुरु आहे. याअंतर्गत अनेक वसाहतींमध्ये अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. यात 1900 किलोमीटरच्या जलनाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या नव्या योजनेदरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारे 700 किलोमीटरचे जुने पाईप बदलले जाणार आहेत. लाईन बदलल्यानंतर महापालिकेची (Aurangabad Municipal corporation) परवानगी असलेले नळच नव्या लाइनवर जोडले जातील. त्यामुळे बेकायदा नळांचा प्रश्न आपोआप मार्गी लागणीर आहे.

परवानगी असेल त्यांनाच कनेक्शन

पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरातील 700 किलोमीटरचे जुने पाईप काढून त्याठिकाणी नवे पाईप टाकले जाणार आहेत. हे काम झाल्यानंतर नागरिकांना नव्याने कनेक्शन देताना त्यासाठी महानगरपालिकेची परवानगी आहे का, हे पाहिले जाणार आहे. ज्यांच्याकडे पालिकेची परवानगी असेल त्यांनाच कनेक्शन दिले जाईल, त्यामुळे शहरातील बेकायदा प्रश्न काही अंशी मिटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरवर्षी कोट्यवधींचे नुकसान

शहरातील अनधिकृत नळांची संख्या 1 लाखापेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते. समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या ताब्यात पाणीपुरवठा योजना देण्यात आली होती. त्यावेळी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात 1 लाखाच्या वर बेकायदा नळ असल्याचे समोर आले होते. अनधिकृत नळामुफे महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे आता नव्या योजनेत परवानगी नसलेल्यांना जोडणीच मिळणार नसल्याने ही योजना पथ्यावर पडणार आहे.

इतर बातम्या-

महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं, आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला; संजय राऊतांची जोरदार टोलेबाजी

कोल्हापुरात 95 वर्षीय वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबातील सहा जणांवर मारहाणीचा आरोप

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI