Aurangabad | वैजापूरचे आमदार बोरनारेंच्या समर्थनार्थ शिवसेनेचे दबावतंत्र, विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्याची मागणी

माझ्या भावजाईने माझ्यावर दाखल केलेला हा गुन्हा खोटा असून त्यामध्ये फक्त राजकारण आहे, माझ्या भावजाईने माझ्या काकुला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याबाबत आपण जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर आपल्यावर राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप रमेश बोरनारे यांनी केला.

Aurangabad | वैजापूरचे आमदार बोरनारेंच्या समर्थनार्थ शिवसेनेचे दबावतंत्र, विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्याची मागणी
वैजापुरात शिवसेनेचा आमदार बोरनारेंच्या समर्थनार्थ मोर्चाImage Credit source:
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 8:11 AM

औरंगाबादः वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare) यांच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, यासाठी शिवसेनेतर्फे (ShivSena) दबावतंत्राचा वापर केला जात आहे. गुरुवारी बोरनारे यांच्या समर्थनार्थ वैजापुरात शिवसेना (Vaijapur Shivsena) महिला आघाडीतर्फे मोठा मोर्चा काढण्यात आला. गरीबांची मदत करणारा, महिलांच्या मदतीला धावून येणारा आमदार विनयभंग कसा करू शकतो, असा सवाल करत त्यांच्याविरोधातील गुन्हा मागे घ्यावा. अन्यथा शिवसैनिक शांत बसणार नाहीत, असा इशारा शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे देण्यात आला. वैजापुरात शिवसैनिक महिलांनी याविषयीचे निवेदन उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांना दिले. आमदार रमेश बोरनारे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यक्रमाला गेली म्हणून त्यांच्या भावजयीला मारहाण केल्याची घटना घडली होती. याविरोधात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. नुकताच त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

वैजापुरात शिवसैनिकांचा मोर्चा

आमदार रमेश बोरनारे यांच्याविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे काल मोठा मोर्चा काढण्यात आला. कोरोना काळात गरीब जनतेला मदत करणारा, तालुक्यासाठी दोन वर्षात 300 कोटींचा निधी खेडून आणणारा, महिलांची मदत करणारा आमदार विनयभंग कसा करु शकतो, असा संतप्त सवाल मोर्चातील महिला शिवसैनिकांनी केला. शहरातील वसंत क्लबपासून सुरु झालेला हा निषेध मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचला. त्यावेळी महिला आघाडीच्या सदस्यांसह सर्व शिवसैनिकांनी तक्रार देणाऱ्या महिलेचा तसेच आमदार अधिवेशनास असताना परस्पर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली.

काय आहे प्रकरण?

18 फेब्रुवारी रोजी वैजापूर तालुक्यातील सटाणा इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सत्कार समारंभ होता. या कार्यक्रमात आमदार रमेश बोरनारे यांच्या भावजय जयश्री बोरनारे उपस्थित होत्या. त्यानंतर भाजपच्या कार्यक्रमाला का गेल्या, असा सवाल करीत आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार जयश्री बोरनारे यांनी केली होती. भाजप आघाडीच्या वतीने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली होती. तसेच आमदार बोरनारेंना पाठिशी घालण्याचे प्रयत्न केले जाऊ नयेत, असा इशाराही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला होता. आमदार बोरनारेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर आमदार बोरनारेंविरोधात विनयभंगाचाा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याचा शिवसैनिकांनी तीव्र निषेध केला आहे.

आमदार बोरनारेंची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, रमेश बोरनारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रमेश बोलणारे हे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले तेव्हा त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले. माझ्या भावजाईने माझ्यावर दाखल केलेला हा गुन्हा खोटा असून त्यामध्ये फक्त राजकारण आहे, माझ्या भावजाईने माझ्या काकुला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याबाबत आपण जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर आपल्यावर राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप रमेश बोरनारे यांनी केला.

इतर बातम्या-

Pune | पुणे – मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा ; 22 मार्चपासून सुरु होणार रेल्वे मासिक पास

‘आई कुठे काय करते’मधील यशची गर्लफ्रेंड खऱ्या आयुष्यात आहे इतकी ग्लॅमरस

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.