काय सांगता? पाइप तयार करायला उशीर झाल्यास दर दिवसाला 15 हजार रुपयाचा दंड, औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेत नोटीस!

काय सांगता? पाइप तयार करायला उशीर झाल्यास दर दिवसाला 15 हजार रुपयाचा दंड, औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेत नोटीस!
प्रातिनिधिक छायाचित्र

पाईप निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मशीन बसवण्याचे काम सुरु आहे. मात्र, त्यांची गती खूप कमी आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपनीला प्रति दिवस पंधरा हजारांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 20, 2022 | 3:48 PM

औरंगाबादः शहरातील बहुचर्चित नव्या पाणीपुरवठा योजनेत जायकवाडी धरणापासून नक्षत्रतवाडीपर्यंत अडीच हजार मिमि व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत कंत्राटदार कंपनीकडून जागेवर पाइप निर्मिती सुरु होणे अपेक्षित होते. मात्र यासाठी खूप विलंब झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीला दररोज पंधरा हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.

नक्षत्रवाडीतच पाइप निर्मितीचा कारखाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 12 डिसेंबर 2020 रोजी शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन झाले. त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये जीव्हीपीआर कंपनीला या कामाला सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले. त्यास आता वर्ष पूर्ण होत आहे. कंपनीने शहरातील काही भागात जलकुंभ उभारण्याची तसेच अंतर्गत जलवाहिन्या अंथरण्याचे काम हाती घेतले आहे. कंपनीकडून काही कामे अजूनही सुरु झालेली नाहीत. पाणीपुरवठा योजनेसाठी 2500 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकली जाणार आहे. त्यासाठी जीव्हीपीआर कंपनी नक्षत्रवाडी येथेच पाईप निर्मितीचा कारखाना उभारणार आहे.

दररोज 1500 रुपये दंड

महाराष्ट्र जीलन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर.एस. लोलापोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाईप निर्मितीचे काम सुरु होऊ शकेल. पाईप निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मशीन बसवण्याचे काम सुरु आहे. मात्र, त्यांची गती खूप कमी आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपनीला प्रति दिवस पंधरा हजारांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.

इतर बातम्या-

चांगला माणूस कसा बिघडतो याचं उत्तम उदाहण म्हणजे चंद्रकांत पाटील-विनायक राऊत

‘ये तो सुपर से भी उपर निकला’, Viral Videoतून दिसेल माकडानं कसं सोडवलं चुकटीसरशी कोडं!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें