औरंगाबादेत बॅनरवॉर, लव्ह औरंगाबाद बोर्डासमोर भाजपचे ‘नमस्ते संभाजीनगर’

औरंगाबादेत बॅनरवॉर, लव्ह औरंगाबाद बोर्डासमोर भाजपचे 'नमस्ते संभाजीनगर'

शहराचं नामकरण करण्याच्या मुद्द्यावरुन आधीच राजकारण तापलेलं असताना आता भाजप आणि शिवसेनेमध्ये बॅनर वॉर सुरु झालं आहे. ( BJP Shiv Sena Sambhaji Nagar Aurangabad)

prajwal dhage

|

Jan 16, 2021 | 7:37 AM

औरंगाबाद : शहराचं नामकरण करण्याच्या मुद्द्यावरुन आधीच राजकारण तापलेलं असताना आता भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा बॅनरवॉर सुरु झालं आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) सुपर संभाजीनगर या कॅम्पेनविरोधात भाजपने शहरात नमस्ते संभाजीनगरचे ( Sambhaji Nagar) बॅनर लावले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज (16 जानेवारी) औरंगबादच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात या सगळ्या घडामोडी घडत आहेत. (banner war has started between BJP and Shiv Sena on Sambhaji Nagar or Aurangabad)

लव्ह औरंगाबाद बोर्डसमोर भाजपचे नमस्ते संभाजीनगर

औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामकरणावरुन सध्या राजकारण तापलेलं आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी भाजपकडून होत आहे. तर महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने औरंगाबादच्या नामकरणाला जाहीर विरोध केलाय. काँग्रेसच्या या विरोधामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झालेली असताना भाजपने शहरातील लव्ह औरंगाबाद या बोर्डासमोर नमस्ते संभाजीनगरचे बॅनर लावले आहे. भाजपच्या याच बॅनरमुळे शहरातील राजकारण आता पुन्हा तापणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आदित्य ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. आदित्य यांचा दौरा लक्षात घेऊन येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली आहे. त्यांनी शहरात जागोजागी सुपर संभाजीनगरचे बॅनर लावले आहेत. मात्र शिवसेनेच्या याच कॅम्पेनिंग विरोधात भाजपने दंड थोपटले असून भाजपने एकीकडे नमस्ते संभाजीनगर म्हणत बॅनरबाजी केली आहे. भाजपने शहरातील लव्ह औरंगाबाद बोर्डासमोर भाजपने नमस्ते संभाजीनगर लिहून मोठे बॅनर लावले आहे.

आदित्य ठाकरेंचे बॅनर हटवले

शनिवारी आदित्य ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हा दौरा लक्षात घेऊन शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, शहरातील टीव्ही सेंटरसमोरील संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरचे आदित्य ठाकरे यांचे बॅनर काही संभाजी महाराज प्रेमींनी हटवले आहे. पुतळ्याला अडथळा होत असल्यामुळे आदित्य यांचे बॅनर हटवल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे.

दरम्यान, औरंगाबादचं संभाजीनगर करा अशी आग्रही मागणी भाजपकडून केली जात आहे. तर या मागणीला काँग्रेसने विरोध केलाय. या सर्व समर्थन विरोधाच्या खेळात शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यानंतर शनिवारच्या आदित्य यांच्या दौऱ्यादरम्यान काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

काँग्रेस-शिवसेनेची नुरा कुस्तीच, निवडणुकीनंतर औरंगाबादचा ‘तो’ मुद्दा बाजूला पडेल: देवेंद्र फडणवीस

औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ येताच सेनेची नेहमीच माघार; भाजपचा गंभीर आरोप

नामांतराबाबत चर्चेतून मार्ग काढू; ‘त्या’ ट्विटची शहानिशा करू: अजित पवार

(banner war has started between BJP and Shiv Sena on Sambhaji Nagar or Aurangabad)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें