…तर येत्या 6 जुलै रोजी ओबीसी समाजाला न्याय मिळेल: पंकजा मुंडे

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर गेली आहे. त्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (OBC Reservation)

...तर येत्या 6 जुलै रोजी ओबीसी समाजाला न्याय मिळेल: पंकजा मुंडे
pankaja munde

बीड: ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर गेली आहे. त्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य सरकारने व्यवस्थित बाजू मांडली असेल तर येत्या 6 जुलै रोजी ओबीसी समाजाला न्याय मिळेल, अशी आशा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. (BJP leader Pankaja Munde reaction on OBC Reservation hearing)

ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 6 जुलै रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे आम्ही याचिका दाखल केली नाही, असं त्या म्हणाल्या. बीडमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

दोन समाजात भांडणं लावू नका

केंद्र सरकारने मराठा आरक्षणप्रकरणी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कोर्टाने याचिका फेटाळून लावल्याने पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

राज्याने सक्षम असल्याचं दाखवून द्यावं

ईडीकडून होत असलेल्या कारवाईवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आघाडी सरकार प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. राज्याचा केंद्राच्या सक्षमतेवर विश्वास असल्याचं त्यातून दिसून येतं. पण आता ते किती सक्षम आहेत हे त्यांनी दाखवून दिलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

251 किलोच्या पुष्पहाराने स्वागत

पंकजा मुंडे आज बीड दौऱ्यावर आहेत. त्या बीड येथील एका खासगी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी कोरोनाच्या संकट काळात सेवा देणाऱ्या आरोग्य सेवकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना कार्डचे वाटप केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सर्वप्रथम पंकजा मुंडे यांचा क्रेनच्या सहाय्यानें तब्बल 251 किलोच्या पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. तर 150 किलो फुले उधळण्यात आली. पंकजा मुंडे आणि गर्दी हे बीड जिल्ह्याचे समीकरण आहे. आज पंकजा मुंडेंची क्रेज पुन्हा एकदा पहावयास मिळाली. (BJP leader Pankaja Munde reaction on OBC Reservation hearing)

 

संबंधित बातम्या:

OBC Reservation: जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर 6 जुलै रोजी सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

आर्थिक देवाणघेवाण झाली की जरंडेश्वर कारखान्याचं प्रकरण आपोआप मिटेल: राजू शेट्टी

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांना घेऊन पंतप्रधानांची भेट घ्या, केंद्र सरकार ऐकत नसेल तर फडणवीसांनाही सोबत न्या: मेटे

(BJP leader Pankaja Munde reaction on OBC Reservation hearing)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI