औरंगाबादमध्ये कोरोना लसींचा काळाबाजार उघड, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

राज्यात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसींचा काळाबाजार सुरु आहे. औरंगाबाद शहरात हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औरंगाबादमध्ये कोरोना लसींचा काळाबाजार उघड, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : राज्यात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसींचा काळाबाजार सुरु आहे. औरंगाबाद शहरात हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Black market of corona vaccines uncovered in Aurangabad, one accused in police custody)

औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज परिसरात असलेल्या एका खोलीत आरोग्य विभागाचा कर्मचारी कोरोना लस चोरी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा कामगार या चोरलेल्या लस दुसऱ्यांना टोचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

काही दिवसांपूर्वी पोलिसांना ही माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी हा काळाबाजार सुरू असलेल्या ठिकाणी धड टाकली. त्यानंतर या लसींच्या कुप्या आणि एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. हा प्रकार औरंगाबाद पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

गणेश दूरळे असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात, चोरी, शासकीय मालमत्तेचे नुकसान, फसवणूक आदी कलमांखाली आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादेत लसीचा मोठा तुटवडा

लस उपलब्ध नसल्यामुळे औरंगाबाद शहरात बहुतांश लसीकरण केंद्रे बंद आहेत. शहरात काल तीन लसीकरण केंद्रांवर कोव्हक्सिन लस उपलब्ध होती. लस उपलब्ध नसल्यामुळे औरंगाबादेत जवळपास 45 हजारपेक्षा जास्त नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.

45 हजार पेक्षा जास्त नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

औंरंगाबाद शहरात मागील काही दिवसांपासून लसींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. लसीकरण केंद्रांवर लसीसाठी लोकांची झुंबड उडालेली पाहायला मिळते. आजसुद्धा (8 ऑगस्ट) शहरातील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद होते. एकूण फक्त 3 लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध होती. लस उपलब्ध होत नसल्यामुळे येथे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शहरात जवळपास 45 हजार पेक्षा जास्त नागरिक कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व नागरिकांचे 84 दिवस उलटून गेले आहेत. आम्हाला लवकरात लवकर लस दिली जावी अशी मागणी या नागरिकांकडून होत आहे.

इतर बातम्या

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याची औरंगाबादेत आत्महत्या

लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात, औरंगाबादमध्ये तरुणाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

औरंगाबादेत लसीचा मोठा तुटवडा, 45 हजारपेक्षा जास्त नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

(Black market of corona vaccines uncovered in Aurangabad, one accused in police custody)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI