फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याची औरंगाबादेत आत्महत्या

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातील रामनगर विहामांडवा येथील रामनगर येथे आत्महत्येची घटना उघडकीस आली. संबंधित 19 वर्षीय युवक हा डीफार्मसीचे शिक्षण घेत होता.

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याची औरंगाबादेत आत्महत्या
औरंगाबादेत विद्यार्थ्याची आत्महत्या

औरंगाबाद : डीफार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. घरातील फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. एकाच दिवशी आत्महत्येच्या दोन घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातील रामनगर विहामांडवा येथील रामनगर येथे आत्महत्येची घटना उघडकीस आली. संबंधित 19 वर्षीय युवक हा डीफार्मसीचे शिक्षण घेत होता. राहत्या घरीच त्याने पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. मात्र त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अस्पष्ट आहे.

34 वर्षीय तरुणाचाही गळफास

दुसरीकडे, लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या 34 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद शहरातील पाडेगाव येथील सैनिक कॉलनीत सोमवारी घडली आहे. भाऊलाल हिरालाल वाणी (वय 34 वर्ष, रा. माजी सैनिक कॉलनी पाडेगाव) असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

भाऊलाल हा मंडप डेकोरेशन करण्याचा व्यवसाय करायचा, मात्र गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊन असल्याने त्याचा व्यवसाय बंद झाला होता. दरम्यान बँकेचे हप्ते थकल्याने बँक कर्मचाऱ्यांनी घरी पैश्यांसाठी तगादा लावला होता. यामुळे भाऊ लाल आर्थिक अडचणीत सापडला होता.

रात्री राहत्या घरात गळफास

काही दिवसांपासून तो टोल नाका येथे काम करू लागला होता. रविवार रात्री घरातील सर्व सदस्य झोपेत असताना भाऊलाल याने राहत्या घरात मंडपच्या दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. पहाटे बहिणीला ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ छावणी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी भाऊलाल याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | आईच्या बेदम मारहाणीत 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, विरारमधील घटना

लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात, औरंगाबादमध्ये तरुणाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI