जिल्ह्यातील 6 लाख नागरिक दोन्ही डोसचे लसवंत, कवच कुंडल मोहिमेत विशेष केंद्रांद्वारे लसीकरणाला यश

  औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात आल्याची चिन्हे पाहून लसीकरणाचा वेग आणखी वाढवल्यास तिसऱ्या लाटेपूर्वी नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढीस लागू शकते. या उद्देशाने देशभरातील नागरिकांचे वेगाने लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 08 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने राबवलेल्या कवचकुंडल मोहिमेअंतर्गत औरंगाबादमध्येही विशेष केंद्र स्थापन करून लसीकरण करण्यात आले. 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात […]

जिल्ह्यातील  6 लाख नागरिक दोन्ही डोसचे लसवंत, कवच कुंडल मोहिमेत विशेष केंद्रांद्वारे लसीकरणाला यश
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 6:23 PM

औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात आल्याची चिन्हे पाहून लसीकरणाचा वेग आणखी वाढवल्यास तिसऱ्या लाटेपूर्वी नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढीस लागू शकते. या उद्देशाने देशभरातील नागरिकांचे वेगाने लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 08 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने राबवलेल्या कवचकुंडल मोहिमेअंतर्गत औरंगाबादमध्येही विशेष केंद्र स्थापन करून लसीकरण करण्यात आले. 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात 6 लाख नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासकांकडून कळवण्यात आली आहे.

लसीकरणाबाबत जनजागृतीही

गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने थैमान घातले. या काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झापाट्याने वाढून अनेकांचा जीव गमवावा लागला. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. लोकांनी लस टोचून घ्यावी, यासाठीदेखील लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यात विविध ठिकाणी कँप लावण्यात आले.

टार्गेट किती, साध्य किती?

औरंगाबाद शहरासाठी 10 लाख 55 हजार 654 नागरिकांना लस (Corona vaccination) देण्याचे टार्गेट होते. तसेच ग्रामीण भागातील 21 लाख 69 हजार 23 लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. अशा प्रकारे औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad district) एकूण 32 लाख 24 हजार 677 नागरिकांना लसवंत करण्याचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत यातील ग्रामीण भागात 10 लाख 33 हजार 691 तर शहरी भागात 6 लाख 5 हजार, 663 असे एकूण 16 लाख 39 हजार 354 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ग्रामीण भागात 3 लाख 1 हजार 448 व शहरी भागातील 3 लाख 37 हजार 173 नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. म्हणजेच दोन डोस घेणाऱ्यांची एकूण संख्या 6 लाख 38 हजार 621 अशी आहे. नियोजित टार्गेटनुसार पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी 50.84 आहे तर दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी 19.80 एवढी आहे.

शनिवारी 9 कोरोनाबाधित

दरम्यान, जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 9 नवे बाधित रुग्ण सापडले. यात मनपाच्या हद्दीत 5 तर ग्रामीण भागात 4 रुग्ण आढळून आले. सध्या जिल्ह्यात 152 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

इतर बातम्या-

औरंगाबाद: व्यावसायिक मीटरची किंमत 1 लाख रुपये? लवकरच अवैध कनेक्शनची तपासणी होणार

चांगल्या कामासाठी औरंगाबाद महापालिकेत योग्य उमेदवार निवडून द्या, डॉ. भागवत कराड यांचे औरंगाबादेत आवाहन 

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.