AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना काळात जनधन-आधार-मोबाइल लिंकिंग योजना ठरली संजीवनी, औरंगाबादच्या राष्ट्रीय बैठकीच्या ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे वक्तव्य

सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या परिषदेत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे कौतुक केले. डॉ. भागवत कराड यांनी मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने पुढाकार घेत जी कामे हाती घेतली आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

कोरोना काळात जनधन-आधार-मोबाइल लिंकिंग योजना ठरली संजीवनी, औरंगाबादच्या राष्ट्रीय बैठकीच्या ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे वक्तव्य
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 16, 2021 | 6:46 PM
Share

औरंगाबाद: केंद्र सरकारमार्फत राबवली जाणारी ‘जनधन-आधार-मोबाइल लिंकिंग’ म्हणजेच ‘जॅम ट्रीनिटी’ योजना ही भारतात गेम चेंजर ठरली असून यामुळे देशात मोठी अर्थक्रांती झाल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister NIrmala Sitaraman) यांनी केले. औरंगाबादमध्ये आज झालेल्या राष्ट्रीयकृत बँक अध्यक्षांच्या बैठकीचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करण्याच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादच्या ताज हॉटेलमध्ये (Hotel Taj) झालेल्या या बैठकीत निर्मला सीतारमण ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहिल्या.

कोरोना काळात गरजूंना थेट केंद्राची मदत

जनधन-आधार आणि मोबाइल लिंकिंग योजनेमुळे कोरोना काळातही देश मोठ्या संकटातून वाचला, असे प्रतिपादन निर्मला सीतारमण यांनी केले. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 या वर्षी जनधन खाते योजना लागू केली. ही योजना लागू होण्यापूर्वी नागरिकांना बँकेत येण्यास संकोच वाटत असे. मात्र योजना लागू झाल्यानंतर ते आवर्जून बँकेत येत आहेत. प्रत्येकाच्या नावाने बँकेत खाते उघडले गेले. प्रत्येकाला एटीएम कार्ड मिळाले. त्यामुळे अनेकांच्या आर्थिक विश्वात अमूलाग्र बदल झाला. मोदी सरकारच्या या योजनेमुळे अगदी तळागाळातील नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढल्याने ही योजना देशात गेमचेंजर ठरली आहे. कोरोना काळात तर जनधन-आधार मोबाइल लिंकिंग योजनेमुळे गरजवंतांना खरा फायदा झाला. यामुळे पूर्णपणे लॉकडाऊनची स्थिती असतानाही देश बचावला, असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

डॉ. भागवत कराडांचे अर्थमंत्र्यांकडून कौतुक

सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या परिषदेत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे कौतुक केले. डॉ. भागवत कराड यांनी मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने पुढाकार घेत जी कामे हाती घेतली आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. डॉ. भागवत कराड यांच्याच पुढाकारातून राष्ट्रीय स्तरावरील ही बँकेची परिषद प्रथमच औरंगाबादेत भरवली गेली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अध्यक्षांची उपस्थिती

मंथन या सार्वजनिक क्षेत्रातील बँक परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्घाटनपर भाषण केले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती. तसेच डीएफएसचे सहसचिव डॉ. बी.के. सिन्हा, इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष राजकिरण राय, एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा, बीओआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए.के.दास, पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीएच एस.एस मल्लिकार्जून रान यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेत जनधन योजना, मुद्रा लोन, ऑनलाइन कृषी कर्जवाटप आदी योजनांचा लाभ सामान्यांना प्रभावीपणे कसा घेता येईल, यावर मंथन करण्यात आले.

इतर बातम्या- 

Aurangabad Top 5: जाणून घ्या औरंगाबाद शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पाच बातम्या मोजक्या शब्दात

74 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळ्यासाठी औरंगाबाद सज्ज, पोलिसांचे संचलन, उद्या सकाळी 9 वाजता ध्वजारोहण

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?