AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादः उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावे, चंद्रकांत खैरे यांचे ग्रामदैवत खडकेश्वराला साकडे!

औरंगाबादचे माजी खासदार आणि ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर मंदिरात आज सकाळीच महादेवाला अभिषेक केला. मुख्यमंत्री लवकरात लवकर बरे व्हावे, असं साकडं खैरे यांनी ग्रामदेवतेला घातलं.

औरंगाबादः उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावे, चंद्रकांत खैरे यांचे ग्रामदैवत खडकेश्वराला साकडे!
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते खडकेश्वर मंदिरात अभिषेक
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 12:10 PM
Share

औरंगाबादः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे माजी खासदार आणि ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर मंदिरात आज सकाळीच महादेवाला अभिषेक केला. मुख्यमंत्री लवकरात लवकर बरे व्हावे, असं साकडं खैरे यांनी ग्रामदेवतेला घातलं. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले हेदेखील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना मणका आणि स्नायूंचा त्रास, शस्त्रक्रिया यशस्वी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या, स्नायूंच्या त्रासाने ग्रस्त आहेत. त्यासाठी त्यांनी सोमवारी गिरगाव येथील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. येथील वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांना एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. आज सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही शस्त्रक्रिया झाल्याची माहिती हाती आली आहे. डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आठवडाभर विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.

शस्त्रक्रियेनंतर आठवडाभर फिजिओथेरपी

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर त्यांना आठवडाभर विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या काळात मुख्यमंत्र्यांवर फिजिओथेरपी सुरु होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून ही माहिती मिळाली आहे.

चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे घनिष्ठ संबंध

शिवसेनेच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून औरंगाबदचे चंद्रकांत खैरे आणि शिवसेना हे नाते अगदी घनिष्ठ आहे. 8 जून 1985 साली खैरेंना शिवसेनेनेच पहिले उपशहरप्रमुख हे पद दिले. 1988 पासून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत खैरे यांनी गुलमंडी वॉर्डातून महापालिकेची निवडणूक लढवली आणि जिंकून दाखली. तेव्हापासून त्यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. 1990 मध्ये ते आमदार झाले. त्यानंतर 1995 नंतर त्यांनी खासदारकी गाजवली. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्यासमोर खैरे यांना पराभव पत्करावा लागला.

इतर बातम्या-

औरंगाबादकरांसाठी खुशखबर! बच्चे कंपनीचे लाडके सिद्धार्थ उद्यान, प्राणीसंग्रहालय आजपासून खुले

आधीच शाळा नाही, त्यात आत मनमानी सुट्ट्या, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्या वाढल्या, विद्यार्थ्यांचा विचार कधी?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.