AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वाद, औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकात गोंधळ

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरातील स्थानकावर एक सामान्य बस उभी होती. या बसमध्ये काही प्रवासी बसलेले होते. तेवढ्यात तिथे दुसरी शिवशाही बस आली. त्यानंतर शिवशाही बस भरण्यासाठी सामान्य बसमधील प्रवाशांना उतरवण्यात आले. नंतर याच प्रवाशांना शिवशाही बसमध्ये बसण्यात आले. याच कारणामुळे सामान्य बस आणि शिवशाही बसमधील कर्मचाऱी यांच्यात वाद पेटला.

दोन एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वाद, औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकात गोंधळ
Auranagabad-City-Bus
| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 4:43 PM
Share

औरंगाबाद : बसमध्ये जास्तीत जास्त प्रवासी बसावेत तसेच जास्तीत जास्त भाडे मिळावे यासाठी शिवशाही आणि सामान्य बस कर्मचाऱ्यामध्ये चांगलाच वाद झाला. हा प्रकार औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर घडला. यावेळी दोन एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्यामुळे प्रवासी बराच वेळी ताटकळत उभे होते. (clash between Shivshahi and normal bus driver in Aurangabad)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरातील बसस्थानकावर एक सामान्य बस उभी होती. या बसमध्ये काही प्रवासी बसलेले होते. तेवढ्यात तिथे दुसरी शिवशाही बस आली. त्यानंतर शिवशाही बस भरण्यासाठी सामान्य बसमधील प्रवाशांना उतरवण्यात आले. नंतर याच प्रवाशांना शिवशाही बसमध्ये बसण्यास सांगितले गेले. याच कारणामुळे सामान्य बस आणि शिवशाही बसमधील कर्मचाऱी यांच्यात वाद पेटला. हा वाद नंतर विकोपाला गेला. दोन्ही कर्मचाऱ्यांनी बसस्थानकावर अक्षरश: गोंधळ घातला.

प्रवाशांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले 

कर्मचाऱ्यांच्या या भांडणामुळे मध्यवर्ती बसस्थानकावर गोंधळ निर्माण झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा यासाठी मध्यस्थी करावी लागली. मात्र, या सर्व भांडणामध्ये बराच वेळ प्रवाशी ताटकळत बसले होते. घडलेल्या या प्रकाराची सध्या शहरात एकच चर्चा सुरु आहे.

आयकर विभागाचा धाक दाखवून मागितली 60 लाख रुपयांची खंडणी

दरम्यान, औरंगाबादेत उद्योजकांना धमकावण्याचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाहीये. सध्या एका उद्योजकाला आयकर विभागाचा धाक दाखवून 60 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. भामट्यांनी खंडणी मागताच उद्योजकाने थेट पोलिसांकडे धाव घेतली असून सुशांत दत्तात्रय गिरी असे तक्रारदार उद्योजकाचे नाव आहे. या घटनेमुळे औरंगाबादेतील उद्योजक जगतात एकच खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या

आता खासगी क्षेत्रातही आरक्षण ? लवकरच शासनाकडे अहवाल सादर करणार, प्रणिती शिंदेंची माहिती

कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ, औरंगाबाद विद्यापीठ अनाथ विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारणार

(clash between Shivshahi and normal bus driver in Aurangabad)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.