AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुल्लीबाई अ‍ॅपविरुद्ध औरंगाबादेत गुन्हा दाखल, केंद्र सरकार मूग गिळून बसलंय का? वकील आस्मा शेख यांचा सवाल

देशभरात गाजत असलेल्या सुल्ली डील व बुल्लीबाई अ‍ॅपवरून (Bullibai App) मुस्लिम महिलांची बदनामी होत असून या अ‍ॅपच्या निर्माता आणि चालकांविरुद्ध औरंगाबादच्या अ‍ॅड. आस्मा शेख यांनी गुन्हा दाखल केला आहे.

बुल्लीबाई अ‍ॅपविरुद्ध औरंगाबादेत गुन्हा दाखल, केंद्र सरकार मूग गिळून बसलंय का? वकील आस्मा शेख यांचा सवाल
Adv Asma Shaikh, Aurangabad
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 10:50 AM
Share

औरंगाबादः देशभरात गाजत असलेल्या सुल्ली डील व बुल्लीबाई अ‍ॅपवरून (Bullibai App) मुस्लिम महिलांची बदनामी होत असून या अ‍ॅपच्या निर्माता आणि चालकांविरुद्ध औरंगाबादच्या अ‍ॅड. आस्मा शेख यांनी गुन्हा दाखल केला आहे.  शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या तक्रारीविषयी सविस्तर भूमिका मांडली. या अ‍ॅपमुळे मुस्लिम महिलांना समाजात वावरणे असुरक्षित वाटत असून अ‍ॅप तयार कऱणारे आणि ते चालवणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय म्हणाल्या अ‍ॅड. आस्मा शेख?

या अ‍ॅपवर 18 ते 70 वर्षांच्या महिलांचे फोटो अपलोड करून त्यांची बोली लावण्यात आली. अजित भारती या व्यक्तीने ट्विटरवरून ही माहिती दिली. मात्र 13 जुलै 2021 रोजी या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे मी तक्रार दिली, मात्र अद्याप यावर कारवाई झालेली नाही. राज्यातही या प्रकरणी आवाज उठवण्यात आला. औरंगाबादेत पोलीस आयुक्तांनी तक्रार दाखल करून घेतली. या अ‍ॅपमुळे महिलांना समाजात वावरणे असुरक्षित वाटत आहे, महिलांच्या स्वातंत्र्याला यामुळे बाधा पोहोचत आहे. किती महिलांचे फोटो यावर अपलोड केले आहेत, याची संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध नाही. पण ज्यांचे फोटो अशा पद्धतीने अ‍ॅपवर टाकले गेले असतील त्यांनी आवर्जून तक्रार दाखल करावी, असे आवाहन मी करत आहे.

केंद्रातल्या महिला मंत्री गप्प का?

मुस्लिम महिलांची अशा प्रकारे बदनामी होत असताना केंद्र सरकार मूग गिळून बसले आहे का, आगामी पाच राज्यांती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. केंद्रातील महिला मंत्र्यांनीही याविषयी एकही शब्द काढला नाही. त्या गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

इतर बातम्या-

Travel tips : जगातील हे खास देश जिथे भारतीयांना जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही, जाणून घ्या हे देश नेमके कोणते!

CCTV | रात्री गाडी अडवल्याचा राग, शिवसेना पदाधिकाऱ्याची सकाळी तरुणाला रॉडने मारहाण

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.