चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काहीच फरक पडणार नाही, आघाडीचा प्रयोग आधीही फसला: फडणवीस

एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. त्यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर राव (k. chandrashekhar rao) मलाही येऊन भेटले होते.

चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काहीच फरक पडणार नाही, आघाडीचा प्रयोग आधीही फसला: फडणवीस
दलाली खाणे हाच सरकारचा धंदा : फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 11:04 AM

औरंगाबाद: एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. त्यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर राव (k. chandrashekhar rao) मलाही येऊन भेटले होते. कालच्या त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही, असं सांगतानाच यापूर्वीही विरोधकांनी लोकसभेत आणि विविध राज्यांमध्ये हातात हात घालून आघाडीचे प्रयोग केले होते. त्यांचा प्रयोग फसला होता, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतल्याबाबत विचारण्यात आले. त्यावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील आघाडी सरकार सुडाचे राजकारण करत असल्याची टीकाही केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव यांची पत्रकार परिषद मी ऐकली नाही. पण एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री येऊन दुसऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं ही काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री मला भेटले होते. त्यामुळे मला यात काही फार महत्त्वाचे वाटत नाही. या सर्वांनी मागच्या लोकसभेत हातात हात घालून मोठी आघाडी केली होती. त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशात त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. देशातील विविध राज्यात त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. कुठेही त्याचा परिणाम झाला नाही. खरे तर आता तेलंगणात टीआरएसची अवस्था वाईट आहे. मागच्या लोकसभेत तेलंगणात भाजपच्या चार जागा निवडून आल्या होत्या. पुढच्यावेळी तेलंगणात भाजपच नंबर वन असेल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सुडाचं राजकारण सुरू आहे

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिका कारवाई करणार आहे. त्याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे सरकार सुडाचं राजकारण करत आहे. मात्र, न्यायालय आहे. त्या संदर्भात योग्य कार्यवाही करेल, असं ते म्हणाले.

गावोगावी काय चाललंय सर्वजण पाहत आहेत

रोज काय होत आहे. हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राणेंवर काय कारवाई झाली, त्यांच्या मुलाबाबत काय झालं. सोमय्यांचा कशा पद्धतीने जीव घेण्याचा प्रयत्न झाला. रवी राणांबाबत काय चाललं आहे सर्व लोक पाहत आहेत. गावोगावी काय चाललंय हे सर्व पाहत आहे. सुडाचं राजकारण कोण करत आहे सर्वजण पाहत आहेत. सरकारची सुडाची भावना त्यातून पुढे येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Maharashtra News Live Update : किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार, ठाकरे सरकारवर आरोपांची मालिका सुरुच

राणे आत्ता खुनी दिसतायत, मुख्यमंत्री केले तेव्हा काय धुतल्या तांदळाचे होते का? शिवसेनेला हिंगोलीतून घरचा आहेर

VIDEO: आता शिवसेनेची विदर्भावर स्वारी, थेट फडणवीसांनाच आव्हान देणार; संजय राऊत यांचे संकेत

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.