VIDEO: आता शिवसेनेची विदर्भावर स्वारी, थेट फडणवीसांनाच आव्हान देणार; संजय राऊत यांचे संकेत

आता शिवसेना (shivsena) विदर्भात पक्ष वाढवण्यावर भर देणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या गडातच आपलं बस्तान बसवण्याचा प्रयत्न करणार असल्याने फडणवीस यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

VIDEO: आता शिवसेनेची विदर्भावर स्वारी, थेट फडणवीसांनाच आव्हान देणार; संजय राऊत यांचे संकेत
आता शिवसेनेची विदर्भावर स्वारी, थेट फडणवीसांनाच आव्हान देणार; संजय राऊत यांचे संकेत
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 10:24 AM

नागपूर: आता शिवसेना (shivsena) विदर्भात पक्ष वाढवण्यावर भर देणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या गडातच आपलं बस्तान बसवण्याचा प्रयत्न करणार असल्याने फडणवीस यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. विदर्भात शिवसेना वाढावी म्हणून शिवसेना पक्षांतर्गत अनेक बदल करणार आहे. विदर्भातील पक्ष संघटनेत लवकरच फेरबदल करण्यात येणार आहे. तसचे विदर्भातील शिवसेनेच्या कोट्यातील मंत्रिपदही देण्यात येणार आहे. विदर्भाला एक मंत्रीपद देऊन पक्ष विस्तार करण्यावर शिवसेनेचा भर असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, आमदार संजय राठोड यांचं शिवसेना मंत्रीपद देऊन पुन्हा पुनर्वसन करणार की नव्या चेहऱ्याला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत हे नागपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. आता विदर्भात लक्ष घालायला सुरुवात करतोय. विदर्भात शिवसेना मजबूतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत कालच चर्चा झाली. विदर्भात लवकरच काही महत्त्वाचे बदल होतील. विदर्भात शिवसेनेच्या कोट्यातील मंत्रीपदाबाबतंही लवकरंच निर्णय होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी संघटनात्मक निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

नागपुरात तळ असेल

नक्कीच नागपूर बदललंय, दोन वर्षानंतर आलोय. आता हळूहळू मी नागपूरला येणार आहे. नागपुरात येऊन संघटन बांधणीला वेळ देणार आहे. नागपूरात माझा तळ असेल, असंही त्यांनी सांगितलं.

आघाडी वगैरे शब्द बदला

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आघाडी वैगेरे शब्द बदला. देशात तिसरी आघाडी, चौथी, पाचवी आघाडी कधीही यशस्वी झाली नाही. निवडणूका आल्या की आघाड्यांचे आकडे येतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साडेचार तास चर्चा झाली. विकास, अर्थिक विषय आणि देशाच्या राजकारणावर प्रदीर्घ चर्चा झाली. अनेक विषयांवर सहमती झाली. भविष्यातील राजकीय दिशा बाबत चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं.

काँग्रेसशिवाय आघाडी अशक्य

के. सी. राव, उद्धव ठाकरे आणि देशातील आणखी काही नेते लवकरच भेटणार आहेत. काँग्रेस शिवाय काही फ्रंट होईल, हे आम्ही कधीच म्हटलं नाही. जेव्हा ममता बॅनर्जी भाजप विरोधी फ्रंटबाबत बोलत होत्या, तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता. जो काँग्रेसला सोबत घेण्याबाबत बोलत होता. के सी राव यांच्यात क्षमत आहे. सर्वांना सोबत घेऊन नेतृत्त्व करण्याची त्यांची क्षमता आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ज्ञान देण्याची गरज नाही

यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. त्यांनी आमच्या पक्षप्रमुखाला विनंती करण्याची गरज आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते आतापर्यंत मी या ठाकरे परिवारासोबत आहे. त्यांनी आम्हाला फार ज्ञान देण्याची गरज नाही. त्यांनी आपला पक्ष सांभाळावा, त्यांचा पक्ष कणाकणाने रोज झिजतोय आणि संपतोय, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार?…नॅशनल क्रश असलेली रश्मिका ‘या’ घराण्याची सून होणार!

कापडणीस पिता-पुत्राच्या दुहेरी हत्याकांडाचे पुरावे हाती; मोखाडा घाटाने सारे वदवले, स्पिरीट टाकून चेहरा जाळला…!

आमदार रमेश बोरनारे यांचा राजीनामा घ्यावा, भाजप महिला आघाडी आक्रमक, काय आहे भूमिका?

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.