AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abdul Sattar : ‘शिंदे आणि शिवसेनेत वाद सुरू होता, त्यांच्या खात्याच्या परस्पर बैठका घेतल्या जात होत्या’, सत्तानाट्यानंतर अखेर अब्दुल सत्तांरांनी सगळंच सांगितलं

बंडामागे शिंदेंचा स्वार्थ असल्याची टीका शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येतेय. याबाबत शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदेंच्या बंडाळीचं नेमकं कारण आज टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

Abdul Sattar : 'शिंदे आणि शिवसेनेत वाद सुरू होता, त्यांच्या खात्याच्या परस्पर बैठका घेतल्या जात होत्या', सत्तानाट्यानंतर अखेर अब्दुल सत्तांरांनी सगळंच सांगितलं
'शिंदे आणि शिवसेनेत वाद सुरू होता, त्यांच्या खात्याच्या परस्पर बैठका घेतल्या जात होत्या', सत्तानाट्यानंतर अखेर अब्दुल सत्तांरांनी सगळंच सांगितलंImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 4:50 PM
Share

औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला, शिवसेना (Shivsena) दुभंगली आणि राज्यात सत्तेचं नवं समीकरण जन्माला आलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. तत्पूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तब्बल 10 दिवस शिवसेनेचे 40 आणि अपक्ष 10 असे 50 आमदार सूरत आणि गुवाहाटी मुक्कामी होते. शिंदे यांनी बंडाचा पवित्रा का घेतला? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या छायेखाली वाढलेल्या शिंदेंनी बंडाचं निशाण का फडकावलं? असा सवाल आजही विचारला जातोय. त्यामागे शिंदेंचा स्वार्थ असल्याची टीका शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येतेय. याबाबत शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदेंच्या बंडाळीचं नेमकं कारण आज टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

शिंदे खूप नाराज होते – सत्तार

अब्दुल सत्तार म्हणाले की, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट सांगतो, मी खरी परिस्थिती सांगतो. शिंदे आणि शिवसेनेत थोडा थोडा वाद सुरू होता. त्यांच्या खात्याच्या परस्पर बैठका घेतल्या जात होत्या. शिंदे खूप नाराज होते. मात्र, तेच तुम्हाला अधिक सांगू शकतात. शिंदेंनी आपल्याला काय पाहिजे हे त्यांनी कधीही म्हटलं नाही. पण शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची भावना होती. रात्री दोन वाजताही शिंदे फोन उचलतात. ते धावून येतात. काही नेत्यांना भेटीची मागणी केली तरी ते भेटायचे नाही. मला कोरोना झाल्यावर लिलावतीत दाखल केले होते. तेव्हा ते किट्स घालून मला भेटायला आले. मलाच नाही तर अनेकांना ते भेटायला गेले. जेव्हा लोक कोरोनात एकमेकांना भेटत होते. तेव्हा तो माणूस भेटायला आला होता.

‘असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटणार नाही’

दयाळू मयाळू असा नेता कधीच भेटणार नाही. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटणार नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे भाषण केलं. अत्यंत साध्या शब्दात ते बोलले, मनापासून बोलले. इतकं मनापासून बोलणारा नेता मी अजून पाहिला नाही. ते लिहिलेलं भाषण नव्हतं. ते आत्मा आणि परमात्म्याला साक्षी ठेवून बोलत होते. त्यावेळी 100 लोकांना मी रडताना पाहिलं. मी अनेक मयतींना गेलो. किती मेले, किती खपले पण मी कधी रडलो नाही. पण काही झालं तरी एखादा शेतकरी मेला तरी शिंदेंना त्याची जाणीव आहे. कुणाचा अपघात झाला तरी त्याची जाणीव ठेवणारा नेता आहे. आम्ही शेतकरी आहोत. माझे वडील शेतकरी होते. आत्महत्याग्रस्त तालुक्यात काम करण्याची माझी इच्छा आहे. शेतकरी आत्महत्या रोखायची आहे. एक समिती नेमून शेतकरी आत्महत्याच्या कारणांचा शोध घेऊन त्यांचा विकास करायचा आहे, असं शिंदे म्हणाले. त्यांचं हे वाक्य मला खूप आवडलं, अशा शब्दात सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांच्या स्वभावाचं कौतुक केलं.

‘मातोश्रीचा रस्ता शिंदेंना माहिती आहे’

मातोश्रीवर जाण्याचा रस्ता शिंदेंना माहिती आहे. आम्ही त्यांच्या रिक्षात बसलो आहोत. 50 लोक त्यांच्या रिक्षात आहोत. त्यांचा रस्ता मातोश्रीच्या मार्गाने गेला तर वेल अँड गुड नाही गेला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. शेवटी नेता म्हणून कुणावर तरी विश्वास ठेवावा लागतो. त्यांनीच मला शिवसेनेत नेले. मी काही शिवसैनिक नाही, असा सूचक संकेतही सत्तार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिलाय.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.