औरंगाबाद महापालिका देतेय QR कोड आधारीत कोव्हिड चाचणी अहवाल, वर्षभरातील 5 लाखांपेक्षा जास्त अहवाल उपलब्ध

15 ऑगस्टनंतर झालेल्या आरटीपीसीआर चाचण्यांना महापालिका क्यूआर कोड आधारीत अहवाल देत आहे. मात्र मागील वर्षभारत झालेल्या 5 लाखांहून अधिक नागरिकांचे अहवालदेखील महापालिकेच्या अॅपवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

औरंगाबाद महापालिका देतेय QR कोड आधारीत कोव्हिड चाचणी अहवाल, वर्षभरातील 5 लाखांपेक्षा जास्त अहवाल उपलब्ध
औरंगाबाद महापालिका देतेय क्यूआर कोड आधारीत कोरोना आरटीपीसीआर रिपोर्ट
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 7:41 PM

औरंगाबाद : शहरातील नागरिकांच्या  कोव्हिड-19 साठीच्या RTPCR  चाचणीचा  QR कोड आधारीत  (QR Code RTPCR Report)अहवाल देण्याचा प्रयोग औरंगाबाद महापालिकेने (Aurangabad Municipal Corporation) सुरु केला आहे. या पद्धतीचा अहवाल देणारी औरंगाबाद महापालिका देशातील पहिली महानगरपालिका (First Municipal Corporation in the country) असल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. 15 ऑगस्ट पासून औरंगाबाद महापालिकेने क्यूआर कोड आधारीत कोरोना-चाचणीचा अहवाल देण्यास सुरुवात केली. औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी औरंगाबाद यांच्या सहकार्याने हे काम सुरू करण्यात आले आहे. कोव्हिड – 19 च्या RTPCR चाचणीसाठी QR कोड असलेले अहवाल देण्यात येत आहेत.

वर्षभरातील अहवाल ‘माझी हेल्थ माझ्या हाती’ अॅपवर उपलब्ध

मनपा आयुक्त व प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांच्या मार्गदर्शनाखाली 15 ऑगस्टपासून या प्रकारचे अहवाल देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आजवर मागील 1 वर्षात करण्यात आलेल्या RTPCR चाचण्यांचे जवळपास 5 लाख पेक्षा अधिक लोकांचे QR कोड असलेले अहवाल औरंगाबाद स्मार्ट सिटी चे माझी हेल्थ माझ्या हाती अॅप वर उपलब्ध आहेत. क्यू आर कोड असल्यामुळे रिपोर्ट खरा असल्याची खात्री मिळते. त्यामुळे खोटे अहवाल देऊन फसवणूक करण्याच्या, अहवालाची अफरातफर करण्याच्या प्रकारांना आळा घालता येतो.

RTPCR चाचणीचा QR अहवाल कसा घेणार?

चाचणी केल्यानंतर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर एक एसएमएस येतो. त्यात तुमचा एस आर एफ आई आयडी नमूद असेल. त्यानंतर 12 तासानंतर एसएमएस द्वारे एक लिंक येईल. त्या लिंक वर आपला एस. आर. एफ. आयडी आणि मोबाईल नंबर टाकावा. त्यावर तुमची चाचणी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे तुम्हाला कळेल. याच अहवालात तुमच्या चाचणीचा QR कोड देखील देण्यात आलेला असेल.

आणखी एका पद्धतीने अहवाल मिळणार

औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी औरंगाबाद यांनी ‘माझी हेल्थ माझ्या हाती’ (MHMH) हे ॲप तयार केले आहे. हे ॲप डाऊनलोड करून डाऊनलोड टेस्ट रिपोर्ट यावर क्लिक करावे. नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक आणि SRF id त्यात टाकावा लागेल. त्यानंतर तुमचा QR कोड असलेला अहवाल उपलब्ध होईल.

QR कोड स्वरुपातील अहवाल का उपयुक्त?

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करण्यासाठी RT PCR चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. त्याचबरोबर या चाचणीचे रिपोर्ट QR कोड स्वरूपात असणे बंधनकारक आहे. कोव्हिड – 19 चाचणी निगेटिव्ह असेल तरच विमान प्रवास करण्यास परवानगी मिळते. त्याचबरोबर रेल्वे प्रवास, बस प्रवास, इतर राज्यातील प्रवास या ठिकाणी देखील हा QR अहवाल उपयुक्त ठरतो. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी औरंगाबाद यांनी पुढाकार घेऊन यासाठी काम केले आणि देशात सर्वात प्रथम या प्रकारची अहवाल सुविधा देण्याचा मान मिळवला. या उपक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या MHMH (माझी हेल्थ माझ्या हाती) या ॲपसाठी युवा संशोधक नागेश डोंगरे व त्यांच्या टीमने औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी औरंगाबादला मोठे सहकार्य केले.

खोट्या अहवाल प्रकारांना पायबंद- आस्तिक कुमार पांडेय

देशभरात खोटे RTPCR चाचणी अहवाल सादर केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. औरंगाबादमध्ये अशी घटना घडण्यापूर्वीच QR कोड असलेले अहवाल उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे खोटे अहवाल दाखवण्यासारख्या घटनांना पायबंद घालण्यासाठी मदत होत आहे.” -आस्तिककुमार पाण्डेय – प्रशासक व आयुक्त, औरंगाबाद महानगरपालिका आणि सीईओ, औरंगाबाद स्मार्ट सिटी

इतर बातम्या- 

लिचेडच्या पाण्याचे औरंगाबाद महापालिका करणार शुद्धीकरण, कचऱ्यापेक्षाही तिपटीने घातक लिचेड

औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी भाजपचा स्वबळाचा नारा, बड्या मंत्र्याचे स्पष्ट संकेत, शिवसेनेची कोंडी ?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.