AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन नव्या नगरसेवकांची अखेर हकालपट्टी, मूळ पक्ष MIM अन् गुन्हेगारी पार्श्वभूमी!

काही दिवसांपूर्वी एमआयएममधून हे माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी वरिष्ठांकडे करण्यात येत होती,

औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन नव्या नगरसेवकांची अखेर हकालपट्टी, मूळ पक्ष MIM अन् गुन्हेगारी पार्श्वभूमी!
एमआयएममधून आलेल्या नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 10:28 AM
Share

औरंगाबादः MIM मधून (Aurangabad MIM) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या नव्या दोन नगरसेवकांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे नगरसेवक (Aurangabad NCP) दाखल झाले होते. नगरसेवकांच्या गुन्हेगारी कारवाया माहित असतानाही पक्षाने त्यांना प्रवेश दिला. यामुळे पक्षाची बदनामी होऊ लागली, असा पक्ष सदस्यांचा आरोप होता.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजय साळवे (Vijay Salve) यांनी या दोन नगरसेवकांची हकालपट्टी करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली होती.

औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये मागील दोन वर्षांपासून जोरदार इनकमिंग सुरु केले. 2014 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या पाच माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देण्यात आलाय त्यांच्या वॉर्डात विकास करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मिळेल, असे अमिषही दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात हा निधी मिळाला नाही. त्यामुळे हे नगरसेवकदेखील निवडणुकीपर्यंत पक्षात टिकतील की नाही, याबद्दल साशंकता आहे. तसेच त्यानंतर एमआयएमचे माजी नगरसेवक सय्यद मतीन आणि शेख जफर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला.

नगरसेवकाच्या भावाच्या गाडीत नशेच्या गोळ्या..

पाच दिवसांपूर्वीच सय्यद मतीन यांच्या भावाच्या गाडीत नशेच्या गोळ्या आढळल्या. जफर हा सध्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून हर्सूल कारागृहात आहे. या दोन्ही नगरसेवकाच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी होत असल्याने दोघांचीही हकाल पट्टी करण्याची मागणी केली जात होती. अखेर वरिष्ठांनी ही कारवाई केली.

इतर बातम्या-

विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटलांना महाडिकांचे आव्हान; कोण आहेत अमल महाडिक?

Amrish Patel | चार वेळा विधानसभा, विधानपरिषदेचीही हॅटट्रिक, भाजपचे धुरंधर उमेदवार अमरिश पटेल कोण आहेत?

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.