Aurangabad Gold Rate: लक्ष असू द्या, सोन्याचे दर वाढीच्या दिशेने, पहा औरंगाबाद शहरातले सोन्याचे भाव

आज २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,२०० रुपये प्रति तोळा एवढा दिसून आला. काल हा भाव ४६,८०० रुपये प्रति तोळा एवढा होता. आज औरंगाबाद सराफा बाजारात चांदीचे दर प्रति किलोमागे 68,000 रुपये एवढे असल्याचे दिसून आले.

Aurangabad Gold Rate: लक्ष असू द्या, सोन्याचे दर वाढीच्या दिशेने, पहा औरंगाबाद शहरातले सोन्याचे भाव
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद: गेल्या दोन आठवड्यापासून उतरणीच्या दिशेने असलेल्या सोन्याच्या दरांनी या आठवड्याच्या अखेरीस मात्र चढाईचा आलेख दर्शवला. तसेच चांदीच्या दरातही चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे आगामी सण-उत्सवाच्या काळात किंवा गुंतवणुकीसाठी (Investment in gold) सोने खरेदीचा तुमचा विचार असेल तर अजूनही तुम्ही कमी दरात सोने खरेदीचा आनंद घेऊ शकता. अन्यथा येत्या काही काळात सोने अधिक महागण्याची शक्यता, तज्ञांनी वर्तवली आहे.

शहरात सोने 400 रुपयांनी महागले

औरंगाबाद शहरात आज सोन्याचे आज काही प्रमाणात वाढले. आज २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,२०० रुपये प्रति तोळा एवढा दिसून आला. काल हा भाव ४६,८०० रुपये प्रति तोळा एवढा होता. शेअर बाजारातील चढ-उतारानुसार दर मिनिटाला विविध शहरांतील सोन्या-चांदीचे कमी जास्त होत असतात. मात्र येथे देण्यात आलेले दर हा एकूण मागील काही तासांचा सरासरी दर काढून दिलेले आहेत.

चांदीच्या दरात हजार रुपयांनी वृद्धी

सोन्याच्या दरात काही प्रमाणात उसळी दिसून आली तर चांदीच्या दरात आज तब्बल 1000 रुपयांची वृद्धी दिसून आली. आज औरंगाबाद सराफा बाजारात चांदीचे दर प्रति किलोमागे 68,000 रुपये एवढे असल्याचे दिसून आले. काल हे दर 67 हजार रुपये प्रति किलो असे होते. त्यामुळे चांदीच्या व्यापारात चांगलीच तेजी असल्याचे दिसून येत आहेत.

सोने 50,000 रुपयांपर्यंत जाणार

तज्ज्ञांच्या मते, लवकरच सोने 50,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे. त्याच वेळी जर एखाद्या गुंतवणूकदाराने आधीच सोन्यात गुंतवणूक सुरू ठेवली असेल, तर आता ती धारण करणे फायदेशीर ठरू शकते. जगातील सर्वात मोठा गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड एसपीडीआर गोल्ड ट्रस्टचे होल्डिंग सोमवारी सुमारे 0.5 टक्क्यांनी घसरून सुमारे 1006 टनांवर आले. गेल्या आठवड्याच्या शेवटी ते सुमारे 1,011 टन होते.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासा

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे आपण सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता.

इतर बातम्या-

महत्त्वाची बातमी: सोन्याचे दागिने विकत घेताना ‘या’ तीन खुणा नक्की पाहा, अन्यथा…

सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 31 ऑगस्टपासून ‘हे’ नियम बदलणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI