डिजिटल गोल्ड म्हणजे काय, गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 27, 2021 | 6:35 AM

Digital Gold | भविष्यात अडचणीच्या वेळी डिजिटल गोल्ड किंवा पेपर गोल्डच्या स्वरुपातील हे सोनं विकून तुम्हाला झपटप पैसेही मिळवता येऊ शकतात. मात्र, यामधील गुंतवणूक कितपत फायदेशीर आहे, याबाबत गुंतवणुकदारांमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे.

डिजिटल गोल्ड म्हणजे काय, गुंतवणूक करताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
डिजिटल गोल्ड

मुंबई: कोरोना संकटाच्या अनिश्चित वातावरणात भांडवली बाजार किंवा गुंतवणुकीच्या इतर साधनांऐवजी सोन्यात गुंतवणूक करण्याला लोक जास्त प्राधान्य देत आहेत. केवळ दागिने खरेदी करण्याऐवजी डिजिटल गोल्ड, ईटीएफ गोल्ड किंवा गोल्ड बाँडस (Gold Bond) खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. भविष्यात अडचणीच्या वेळी डिजिटल गोल्ड किंवा पेपर गोल्डच्या स्वरुपातील हे सोनं विकून तुम्हाला झपटप पैसेही मिळवता येऊ शकतात. मात्र, यामधील गुंतवणूक कितपत फायदेशीर आहे, याबाबत गुंतवणुकदारांमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे.

डिजिटल गोल्ड म्हणजे काय?

डिजिटल स्वरुपातील सोनं हे तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता. हे सोनं विक्रेत्याकडून इन्शुअर्ड व्हॉल्टसमध्ये संग्रहित केले जाते. तुम्ही अगदी स्मार्टफोनवरुनही डिजिटल गोल्डची खरेदी करु शकता. विशेष म्हणजे तुम्ही अगदी कमी प्रमाणात म्हणजे अगदी 100 रुपयांचे सोनेही विकत घेऊ शकता.

पेटीएम, गुगल पे आणि फोन पे या तुमच्या दैनंदिन वापरातील मोबाईल अॅप्सचा वापर करुनही तुम्ही हे सोनं विकत घेऊ शकता. याशिवाय, एचडीएफसी सिक्युरिटीज आणि मोतीलाल ओसवाल यांच्यासारख्या ब्रोकर्सकडेही डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचे फायदे

तुम्ही डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करताना किती लहान रक्कम गुंतवू शकता. तुम्ही अगदी 100 रुपयांचे सोने खरेदी करायचे ठरवले तर तेदेखील शक्य आहे. यामध्ये सोन्याच्या शुद्धतेची 100 टक्के हमी असते. तसेच पारंपरिक सोने खरेदीत मोडणाऱ्या वळी, सोन्याची नाणी किंवा दागिन्यांप्रमाणे यावर घडणावळीचे पैसे (Making Charges) लागत नाहीत. तसेच हे सोने डिजिटल स्वरुपात असल्यामुळे त्याच्या सुरक्षेची जोखीम राहत नाही.

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताना काय काळजी घ्याल?

तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ज्या कंपनीच्या माध्यमातून करणार आहात, त्या कंपनीचा रेकॉर्ड तपासून पाहणे गरजेचे आहे. संबंधित कंपनी व्यवहाराबाबत पूर्णपणे पारदर्शकता पाळत आहे का? तुम्हाला रिअल टाईम अपडेट मिळत आहे का, या गोष्टींची खात्री करुन घ्यावी. जेणेकरून सोन्याच्या दरात झालेल्या चढउतारांची तुम्हाला योग्यवेळी माहिती मिळेल आणि तुम्ही योग्यवेळी गुंतवणूक करून फायदा कमावू शकाल.

संबंधित बातम्या

Sovereign Gold Bond : स्वस्तात सोने खरेदीची संधी, जाणून घ्या कसे आणि कुठून खरेदी कराल?

SBI Gold Loanवर विशेष सवलत, जाणून घ्या फायदा कसा घ्याल आणि अंतिम मुदत कोणती?

Paytm वरून गॅस सिलिंडर करा बुक आणि 2700 रुपये कॅशबॅक मिळवा, ऑफर किती दिवस?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI