Weather Alert: ढगांच्या गडगडाटाने मराठवाड्याला धसकी, अधून-मधून पावसाचे फटके सुरुच, पुढील चार दिवस खबरदारीचा इशारा

औरंगाबाद: परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला मुसळधार (Heavy rain in Marathwada) पावसाला अजूनही सामोरे जावे लागत आहे . मराठवाड्यातील विविध भागात सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश दिसतो. काही काळ ऊन राहते. पण दुपारनंतर ऊन-पावसाचा खेळ सुरु होतोय.  वातावरण पूर्णपणे स्वच्छ असतानाच अचानक झाकोळून येतं आणि ढगांचा प्रचंड गडगडाट ऐकू येतो. क्षणात पावसाला सुरुवात होते. त्या पाठोपाठ वीजांचा […]

Weather Alert: ढगांच्या गडगडाटाने मराठवाड्याला धसकी, अधून-मधून पावसाचे फटके सुरुच,  पुढील चार दिवस खबरदारीचा इशारा
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 6:26 PM

औरंगाबाद: परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला मुसळधार (Heavy rain in Marathwada) पावसाला अजूनही सामोरे जावे लागत आहे . मराठवाड्यातील विविध भागात सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश दिसतो. काही काळ ऊन राहते. पण दुपारनंतर ऊन-पावसाचा खेळ सुरु होतोय.  वातावरण पूर्णपणे स्वच्छ असतानाच अचानक झाकोळून येतं आणि ढगांचा प्रचंड गडगडाट ऐकू येतो. क्षणात पावसाला सुरुवात होते. त्या पाठोपाठ वीजांचा कडकडाट सुरु होतो. मागील पंधरा दिवसात अतिवृष्टीचं संकट कोसळलेल्या मराठवाड्याला आता या निसर्गाच्या लहरीपणानं जेरीस आणलं आहे. ढगांचा गडगडाट सुरु झाला की नागरिकांना आता धडकी भरत आहे. आता हा पाऊस आणखी काय चित्र दाखवणार, हीच चिंता ग्रामीण भागापासून शहरी भागातील नागरिकांना सतावत आहे.

दरम्यान, आज 04 ऑक्टोबर रोजीदेखील औरंगाबादह परिसरातील ग्रामीण भागात वीजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. जालना, परभणी, हिंगोलीसह नांदेडमध्येही तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. पुढील चार-पाच दिवसातदेखील मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अशा वेळी ग्रामीण भागातील लोकांनी जास्त सतर्क (weather alert) राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

परभणी परिसरात तुरळक ठिकाणी गारा

परभणीत सकाळपासून कडाक्याचे ऊन होते. त्यामुळे हवेत कमालीची उष्णता पसरली होती. सर्वसामान्य नागरीक या उकाड्याने अक्षरशः हैराण होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आभाळ भरुन आले. पाठोपाठ तीनच्या सुमारास पाऊस सुरु झाला. सव्वा तीनच्या सुमारास काही ठिकाणी गाराच पडल्या. या मुसळधार पावसाने, गाराने सर्वसामान्य नागरीक अक्षरशः गोंधळून गेले. गेल्या पंधरा दिवसात शहरासह जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. या पावसाने खरीप पिकांची दाणादाण उडवविली. तसेच जनजीवनही ठप्प केले होते. दोन दिवसांपासून वातवरण निवळले असतांना पुन्हा सोमवारी दुपारी पावसाने सलामी दिली.

कडक ऊन ते मुसळधार पाऊस

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कडक ऊन आणि मुसळधार पावसाचा जणू लपंडावच सुरु आहे. सकाळपासून वातावरणात कमालीचा उकाडा आहे. आकाशातून स्वच्छ सूर्यप्रकाशही येतो आहे. पण काही मिनिटातच ढग दाटून येत धो-धो पावसाचा मारा होत आहे. यामुळे परिसरातील लोक गोंधळून जात आहेत.

औरंगाबाद- सावखेड्यातील पूलासाठी रस्ता रोको

दरम्यान, आठवडाभर सुरु असलेल्या पावसाचा फटका औरंगाबाद आणि परिसराला चांगलाच बसला आहे. औरंगाबादच्या-सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथील पूर्णा नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. तो पूल तात्काळ दुरुस्त करावा या मागणीसाठी कन्नड-सिल्लोड महामार्गावर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. या रास्ता रोकोमुळे अनेक प्रवासी आणि वाहनधारकांना खोळंबून रहावे लागले.

कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार

प्रादेशिक हवामान विभागानं पावसाचे इशारे जारी केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून यलो अ‌ॅलर्ट

4 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

5 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली 4 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर,

6 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे

7 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग

इतर बातम्या- 

Weather Alert: पुण्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून कोकण, गोव्यालाही अलर्ट

Maharashtra News live Updates : अहमदनगर जिल्ह्यात 61 गावांमध्ये उद्यापासून लॉकडाऊन

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.