Maharashtra Rains Weather : राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, कुठे कुठे कोसळधार?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 19, 2021 | 8:04 AM

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. उद्यापासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra Rains Weather : राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, कुठे कुठे कोसळधार?
Rain Update
Follow us

मुंबई : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. उद्यापासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय.

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. स्मॉल ऑरेंज डायमंड, उत्तर-पश्चिम मध्यप्रदेश, पुर्व राजस्थान स्थित कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासात क्षीण होतंय. स्मॉल ऑरेंज डायमंड बंगालच्या उपसागरावरची सिस्टिम पुढच्या 12 तासात ओरिसाकडे सरकेल व पुढच्या 2,3 दिवसात पश्चिम- उत्तर पश्मिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे, अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिलीय.

कुठे कुठे पाऊस पडणार?

कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

19 सप्टेंबर- राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला 19 सप्टेंबर रोजी पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.

20 सप्टेंबर- पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया (यलो अलर्ट)

21 सप्टेंबर- पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड औ,रंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, , गोंदिया (यलो अलर्ट)

22 सप्टेंबर- 22 सप्टेंबर- पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली (यलो अलर्ट)

पुढील दोन दिवसात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दहा दिवसांपूर्वीच औरंगाबाद आणि संपूर्ण मराठवड्यात (Heavy rain forecast in Marathwada) अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता. आता पुन्हा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस

प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यापैकी 20 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीडमध्येही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ही माहिती, डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून मिळाली आहे.

हे ही वाचा :

Aurangabad Weather: मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, वाचा औरंगाबादसह कोणते जिल्हे यलो अलर्टवर?

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI